या आठवड्याचं भविष्य कसं असेल?

या आठवड्याचं भविष्य कसं असेल?

आर्थिक व्यवहार जपून करा 
मेष : हा सप्ताह संमिश्र स्वरूपातून फलदायी होणारा. रवी-शनी योगाची पार्श्‍वभूमी घरगुती संदर्भात प्रतिकूल. वृद्धांविषयीची चिंता सतावेल. बाकी, कृत्तिका नक्षत्राच्या सप्ताहाची सुरवात धनवर्षावाची. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येला जागरण होईल. गुप्त चिंता. आर्थिक व्यवहारांतून साशंकता. व्यवहार जपून करा. 

मित्रांकडून विलक्षण लाभ 
वृषभ : सप्ताह कुयोगांवर मात करणारा. फक्त आहार-विहारासंबंधी पथ्यं पळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह विलक्षण शुभ घटनांद्वारे चकित करेल. ता. एक ते तीन हे दिवस अफलातून राहतील. मित्रांकडून विलक्षण लाभ. शनिवारच्या अमावास्येचं प्रभावक्षेत्र मृग नक्षत्राच्या व्यक्तींना कायदेशीर कटकटीचं. घराता वादाचा केंद्रबिंदू व्हाल. काळजी घ्या. 

सेलिब्रिटीचा सहवास मिळेल 
मिथुन :
सप्ताहात कुयोगांच्या पार्श्‍वभूमीवर लक्ष्य होणारी रास. किचकट आणि अहंकारी व्यक्तींचा सहवास टाळा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या पार्श्‍वभूमीवर विचित्र मानवी स्वभावप्रकृतीचा व्हायरस त्रास देईल. बाकी, पुर्नवसू नक्षत्राच्या व्यक्तींना आजची रविवारची संध्याकाळ मनोरंजनाची. सेलिब्रिटींचा सहवास मिळेल. 

महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल 
कर्क :
रवी-शनी कुयोगाची पार्श्‍वभूमी आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात निश्‍चितच दखलपात्र. संशयास्पद वागू नका. पोलिसांचा मान राखा! बाकी, सप्ताहाची सुरवात छानच. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. एक व दोन हे दिवस अतिशय सुंदर. विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. गुरुवार तुमच्यासाठी शुभमुहूर्ताचा. नोकरीत लाभ. 

आहार-विहारादी पथ्यं पाळा 
सिंह :
सप्ताह अडथळ्यांच्या शर्यतीचा. नैसर्गिक अनुकूलता नसलेला सप्ताह. आहार-विहारादी पथ्यं पाळा. प्रवासात काळजी घ्या. बाकी, सप्ताहाची सुरवात शुक्राच्या राश्‍यंतरातून तत्काळ बोलणारी! विशिष्ट आर्थिक कामं होतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत लाभ. गुरुवार विलक्षण सुवार्तांचा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपास वेदनायुक्त व्याधीची शक्‍यता. 

कुटुंबवत्सल लोकांना अर्थलाभ 
कन्या :
हा सप्ताह संमिश्र स्वरूपाची फळं देणारा. वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर खराब. राजकारणी व्यक्तींना त्रास. बाकी, सर्वसामान्य कुटुंबवत्सल माणसांना नववर्षाची सुरवात विशिष्ट आर्थिक लाभ देणारी. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. एक व दोन हे दिवस सुवार्तांचे. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अमावास्या उद्वेगजनक. विचित्र स्वरूपाचा विरोध होण्याची शक्‍यता. 

सरकारी कामं मार्गी लागतील 
तूळ :
नववर्षाचा सप्ताह अनपेक्षित खर्चात पाडणारा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं प्रभावक्षेत्र प्रिय व्यक्तींच्या संदर्भातून खराब. वैद्यकीय खर्च वाढेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र शत्रुपीडा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. एक ते तीन हे दिवस अत्यंत प्रवाही. सरकारी कामं मार्गी लागतील. 

सार्वजनिक ठिकाणी सावधान! 
वृश्‍चिक :
शुक्राचं राश्‍यंतर अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना; विशेषत: तरुणवर्गाला तत्काळ फलदायी होणारं. नववर्षाचा पहिला दिवस जीवनात जान आणणारा! ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं फील्ड ज्वालाग्राही स्वरूपाचं. क्रिया-प्रतिक्रिया देताना काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणी सावधानता बाळगा. 

ओव्हरटेक करू नका! 
धनू :
रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर साडेसातीतलं एक अवघड वळण सुरू होत आहे. ओव्हरटेक करू नका! पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती अमावास्येच्या कुप्रभावाखाली येत आहेत. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह कायदेशीर कटकटींचा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या भाग्योदयाचा योग. परदेशी नोकरी मिळेल. 

आर्थिक धाडस करू नका 
मकर : कुयोगांच्या छायेतला सप्ताह. सप्ताहाचा शेवट अमावास्येच्या आसपासच्या काळात साडेसातीच्या छाया गडद करेल. आर्थिक धाडस करू नका. कुसंगती टाळा. स्वतंत्र व्यावसायिकांच्या अर्थप्राप्तीत सप्ताहाच्या आरंभी वाढ होईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार मोठ्या भाग्यलक्षणाचा. तरुणांना नोकरी मिळेल. 

नोकरीतल्या घडामोडी पथ्यावर 
कुंभ : हा सप्ताह सुरवातीला अतिशय वेगवान राहील. ओळखी-मध्यस्थी यशस्वी होतील. नोकरीतल्या विशिष्ट घडामोडी पथ्यावर पडतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह विशिष्ट सन्मानाद्वारे थक्क करेल. व्यावसायिक कर्जवसुली होईल. सप्ताहाचा शेवट शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना यंत्रपीडेचा. कामगारप्रश्‍न सतावेल. 

नोकरीत काळजीपूर्वक वागा 
मीन :
राशीचा मंगळ आणि मोठ्या ग्रहांच्या कुयोगांची पार्श्‍वभूमी विशिष्ट व्यूहरचना करेल. नोकरीतलं राजकारण सतावेल. काळजी घ्या. सप्ताहातली अमावास्या मोठी चमत्कारिक फळं देईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती विजयोत्सव साजरा करतील. शैक्षणिक यश मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शत्रुपीडेची शक्‍यता. 

पंचांग 
रविवार : मार्गशीर्ष कृ. 9, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.09, सूर्यास्त 6.07, चंद्रोदय रा. 1, चंद्रास्त दु. 1.20, कालाष्टमी, भारतीय सौर पौष 9, शके 1940. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com