हिवाळ्यातील आहार

डॉ. दीपक जगदाळे
03.08 AM

शिशिर आणि हेमंत ऋतूंमध्ये शरीरातील अग्नी प्रदीप्त असतो. त्यामुळे आहाराबाबत फारशी पथ्ये नसतात. पण, त्यामुळे या ऋतूंत चांगल्या आरोग्यासाठी काय खावे, याचे काही निकष आपल्याला सांगता येतील. म्हणजे जे खाऊ त्यातून आपल्या शरीराचे पोषण होईल, याची काळजी घ्यावी लागेल.

आरोग्यमंत्र - डॉ. दीपक जगदाळे, वैद्यकीय तज्ज्ञ 
शिशिर आणि हेमंत ऋतूंमध्ये शरीरातील अग्नी प्रदीप्त असतो. त्यामुळे आहाराबाबत फारशी पथ्ये नसतात. पण, त्यामुळे या ऋतूंत चांगल्या आरोग्यासाठी काय खावे, याचे काही निकष आपल्याला सांगता येतील. म्हणजे जे खाऊ त्यातून आपल्या शरीराचे पोषण होईल, याची काळजी घ्यावी लागेल. या ऋतूंमध्ये होणाऱ्या व्याधी दूर ठेवण्यासाठी आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. निसर्गतः सहज उपलब्ध होणारे आणि हिवाळ्यात शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहारात असणे आवश्‍यक आहे.

हिवाळ्यात सर्दी, खोकल्यासारख्या व्याधींचा त्रास वाढतो. हा त्रास रोखण्यासाठी आहारात गाजराचा समावेश असणे आवश्‍यक आहे. गाजरामध्ये तंतुमय पदार्थ असतात. पोटात तयार होणारी आम्लताही गाजर कमी करते. यात ‘अ’ जीवनसत्त्व असते. हिवाळ्यात सहजतेने मिळणारी बोरे ही बहुगुणी असतात. त्यात स्निग्धांश असतो. यातून पोटातील अग्नी प्रज्वलित होतो. बोरामुळे पित्त व कफ कमी होते, तसेच पोट साफ होण्यास ती उपयुक्त ठरतात. स्निग्ध गुणधर्माचा लसूण हिवाळ्यात आहारात असणे चांगले. त्यामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस असते. तसेच, बार्ली किंवा जवाचे महत्त्व खूप आहे. थंडीमध्ये सर्दी, खोकला याचा त्रास होणाऱ्या रुग्णांना हे उपयुक्त ठरते. जवामध्ये ‘ब’ जीवनसत्त्व आणि अमिनो आम्ल असते. शरीराच्या पोषणासाठी हे उपयुक्त ठरते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter diet