हिवाळा - आरोग्याचा की आजाराचा?

डॉ. दीपक जगदाळे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

हिवाळा हा खरेतर आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत चांगला ऋतू. काही खा. कितीही खा. सगळं पचतं. पण गेल्या काही वर्षांत हवेतील प्रदूषण वाढले आहे. आपल्या आहाराच्या सवयी बदलल्या. जीवनशैली बदलली. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे ‘हेल्दी सीझन’ मानल्या जाणाऱ्या हिवाळ्यातही आपल्या आजूबाजूला सर्दी, खोकला, दमा, सांधेदुखीचे  रुग्ण सहजतेने दिसतात.

आरोग्यमंत्र - डॉ. दीपक जगदाळे, वैद्यकीय तज्ज्ञ 
हिवाळा हा खरेतर आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत चांगला ऋतू. काही खा. कितीही खा. सगळं पचतं. पण गेल्या काही वर्षांत हवेतील प्रदूषण वाढले आहे. आपल्या आहाराच्या सवयी बदलल्या. जीवनशैली बदलली. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे ‘हेल्दी सीझन’ मानल्या जाणाऱ्या हिवाळ्यातही आपल्या आजूबाजूला सर्दी, खोकला, दमा, सांधेदुखीचे  रुग्ण सहजतेने दिसतात. 

दवाखान्यात या आजाराच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली दिसते. या रुग्णांमध्ये लहान मुले व वृद्धांची संख्या मोठी असते. आजार झाल्यानंतर त्याच्यावर उपचार घेत बसण्यापेक्षा हे आजार बळावूच नयेत, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरात किमान तापमानाचा पारा आता हळूहळू खाली उतरत आहे. त्यामुळे आरोग्यदायी अशा ऋतूची चाहूल आता व्यवस्थित लागत आहे. सूर्यास्तानंतर वाढणारा गारठा, पहाटे अंगाला झोंबणारा गार वारा. यात मानवी आरोग्य चांगले राहते. संसर्गजन्य आजारांचे प्रमाणही या ऋतूत तुलनेने कमी असते. पण, हिवाळ्यात थंड हवेमुळे ‘कफ’ वाढतो. त्याचा लहान मुले आणि वृद्धांना त्रास होतो. कडाक्‍याच्या थंडीच्या वेळी घराबाहेर पडताना उबदार कपडे वापरणे हितावह असते. कानटोपी, मफलर, स्वेटर, हातमोजे घालणे गरजेचे असते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे त्वचेला तेलाचा मसाज करावा.

कोरडी त्वचा आहे, त्यांनी साबणाचा वापर कमी करावा. थंडीपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी ‘कोल्ड क्रीम’ लावावे. अंघोळीनंतर टॉवेलने खसाखसा अंग पुसण्याऐवजी हलकेच टिपून घ्या. हिवाळ्यात दमा, सर्दी व खोकला सुरू होतो. औषध घेतल्यानंतरही बरेच दिवस ते कमी होत नाही. चालताना थकवा जाणवतो. श्‍वास भरून येतो, ही अस्थम्याची प्राथमिक लक्षणे आहेत. या लक्षणांकडे काटेकोर लक्ष द्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter health or illness