Womens Day : महिलांच्या हाताखाली काम करायला लाज कसली!

शरयू काकडे
Sunday, 8 March 2020

नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या संधी देताना ही बौध्दिक पात्रता, कौशल्य पाहून योग्य व्यक्तीस देणे अपेक्षित असते मग ती महिला असली तरी. कामाच्या ठिकाणी स्री व पुरुष दोघांनाही एकसमान वागणूक मिळालीच पाहिजे. पण कित्येकदा पुरषी मानसिकतेमुळे महिलांना मागे खेचले जाते. पुरुषांना महिला सहकाऱ्यांच्या खाली काम करणे अपमानास्पद वाटते. महिला सहकारी उच्चपदावर काम करुन लागली पुरुषी मानसिकतेला तर सहन होत नाही. कित्येकदा तर महिला सहकाऱ्यांना सुध्दा ते सहन होत नाही. महिलाच महिला सहकाऱ्यांची उन्नती बघू शकत नाही आणि एकमेकांना मागे खेचण्याचा प्रयत्न करातात. मग अशावेळी त्या उच्चपदावर असलेल्या महिला सहकारीच्या चारित्र्यावर देखील बोट ठेवले जाते.

International Womens Day : जागतिक महिला दिन म्हंटल की, सगळीकडे महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण, नारी शक्ती, वुमन एम्पॉवरमेंट, गर्ल्स पॉवर सारख्या गोष्टींची चर्चा सुरु असते. त्यासाठी विविध उपक्रम आयोजिले जातात, महिलांना मोफत बस प्रवास दिला जातो, महिलांच्या हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी जनजागृती केली जाते. पण हे सगळ एक दिवसापुरते मर्यादीत असतं. महिला दिना व्यतिरिक्तही रोजच्या जीवनात महिलांचे जीवन सहज आणि सोपे करता आले पाहिजे. आजच्या महिला चौकटीपलिकडे येऊन स्वत:चे कर्तृत्व सिध्द करुन घर आणि नोकरी दोन्ही गोष्टी उत्तमपणे सांभळातात. खरंतर आजच्या महिला या मुळातच सबल आहेत गरज आहे, ती कामाच्या ठिकाणी त्यांना योग्य आणि पुरक वातावरण निर्माण करुन देण्याची. महिलांना कामाच्या ठिकाणी मिळणारी संधी, सुरक्षितता, सुविधा याचाही विचार झाला पाहिजे.

Womens Day : आहे ना ती... घेईल सांभाळून!

Image result for workplace and women

महिला, संधी आणि पुरुषी मानसिकता
नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या संधी देताना ही बौध्दिक पात्रता, कौशल्य पाहून योग्य व्यक्तीस देणे अपेक्षित असते मग ती महिला असली तरी. कामाच्या ठिकाणी स्री व पुरुष दोघांनाही एकसमान वागणूक मिळालीच पाहिजे. पण कित्येकदा पुरषी मानसिकतेमुळे महिलांना मागे खेचले जाते. पुरुषांना महिला सहकाऱ्यांच्या हाताखाली काम करणे अपमानास्पद वाटते. महिला सहकारी उच्चपदावर काम करुन लागली पुरुषी मानसिकतेला तर सहन होत नाही. कित्येकदा तर महिला सहकाऱ्यांना सुध्दा ते सहन होत नाही. महिलाच महिला सहकाऱ्यांची उन्नती बघू शकत नाही आणि एकमेकांना मागे खेचण्याचा प्रयत्न करातात. मग अशावेळी त्या उच्चपदावर असलेल्या महिला सहकारीच्या चारित्र्यावर देखील बोट ठेवले जाते. उच्चपदावर काम करणाऱ्या महिलांनी ते पद स्वतःच्या कर्तृत्वामुळे पोहचली आहे हे मान्यच करायचे नसते. त्यामुळे अशा महिलांना या मानसिकतेला तोंड देत आपले काम करत राहावे लागते. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांना सर्वांसोबत चांगले हितसंबध ठेवावे लागतात. कामानिमित्त महिलांना पुरुषांशी बोलावे लागते. पण कित्येकदा याकडे चुकीच्या दृष्टीने पाहिले जाते. अशा महिलांची पुरुष सहकऱ्यांशी असलेल्या मैत्रीवर प्रश्न निर्माण केले जातात. कामाच्या ठिकाणी असे गैरसमज निर्माण करुन महिलेच्या चारित्र्य आणि कर्तृत्वावर प्रश्न निर्माण केला जातो. ही मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचे असते. कामानिमित्त महिलांनी पुरुषांसह मैत्री करणे गैर नाही हे समजून घेणे गरजेचे आहे.  

ही अभिनेत्री स्वतः महिला असून म्हणते माझा महिला दिनावर विश्वास नाही

Image result for workplace and women  and man

काम आणि स्त्री पुरुष भेदभाव
कित्येकदा एखादे अवघड काम असेल तर महिला कर्मचाऱ्यांना न विचारताच त्यांना जमणार नाही असे गृहित धरले जाते. एखादे काम महिलांचे किंवा पुरुषांचे हा भेदभाव कामाच्या ठिकाणी करणे चुकीचे आहे. आज कोणतेही क्षेत्र बघा ...महिला असतात. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कामगिरी करताना दिसतात. असे असताना कामाच्या बाबतीत महिला सहकाऱ्यांना संधी मिळालीच पाहिजे. कित्येकदा एकसारखे पदावर अथवा एक स्वरुपाचे काम करणाऱ्या स्त्री आणि पुरुषांना मिळणारे पगारात तफावत दिसते. फक्त महिला सहकारी आहे म्हणून तिला कमी पगार दिला जातो. पगार देताना स्त्री किंवा पुरुष असा निकष लावणे चुकीचे आहे. 

Women`s Day:देशातच नव्हे, जगभरात महिलांच्या अडचणी सारख्याच; काय आहेत आव्हाने?

Image result for workplace and women  and man

महिलांची सुरक्षितता आणि काम
महिला सहकाऱ्यांवर रात्री उशीरा काम करण्याची वेळ आल्यास काही ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर ठेवून त्यांना संधीच दिली जात नाही. आजच्या काळात महिलांची सुरक्षितता महत्वाची आहे पण, त्याचा अर्थ असा नाही की महिलांना वेळेच्या बंधनात ठेवून त्यांची सुरक्षा केली जाते. त्यापेक्षा अशा संधी महिला सहकाऱ्यांना देऊन त्याच्या सुरक्षिततेसाठी शक्य सुविधा दिल्या पाहिजे. मुळात महिलांना स्वत:ची सुरक्षा करण्यास सक्षम आहेत हे समजून घेतले पाहिजे.  अशी पुरुषी मानसिकता महिलांच्या करीअरमध्ये अडचण ठरते. कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता म्हणजे फक्त त्यांना वेळेत घरी सोडणे किंवा रात्री उशीरा काम असल्यास त्यांना सुरक्षित घरी पोहवण्यापर्यंत मर्यादित नाही. मुळात महिला सहकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत असे वाटले पाहिजे. कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांची गैरवर्तन होत नाही ना याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या गैरवर्तन किंव गैरप्रकारांविरोधात त्यांना आवाज उठविण्यासाठी हक्काची जागा आणि मदत मिळाली पाहिजे.  

#WomensDay : महिलांनो तुमच्यातल्या या गुणांवर करा गर्व..... \

Image result for workplace and women  seafty

महिलांचे मानसिक आणि शारीरीक आरोग्य आणि काम
कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांना योग्य त्या सुविधा दिल्या पाहिजे. महिलांना स्वच्छ स्वच्छतागृह मिळालेच पाहिजे. इतकेच नव्हे तर मासिक पाळीमध्ये काही महिलांना खूप त्रास होतो. अशा वेळी महिलांना आराम करण्यासाठी एक रेस्टरुम प्रत्येक कामाच्या ठिकाणी दिली पाहिजे. तसेच सॅनिटरी नॅपकिन्स कामाच्या ठिकाणी उपलब्ध करुन दिले पाहिजे. कित्येकदा प्रेग्नसीनंतर महिलांना लहान बाळाला घरी ठेवून कामावर जावे लागते. अशावेळी कामाच्या ठिकाणी जाताना महिलांची आई म्हणून मानसिक आणि शारिरीक कसरत होत असते. अशा महिलांसाठी ऑफिसमध्ये लहान मुलांसाठी पाळणाघर किंवा बेबी केअर स्पेस तयार केली पाहिजे. त्यामुळे महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळून कामावर लक्ष देता येते.

Image result for workplace woman health

आजची स्त्री ही वर्किंग वुमन आहे. घर, संसार, कुटुंब आणि काम यासर्व गोष्टी सांभाळताना त्यांची तारेवरची कसरत होत असते. महिलांना कुटुंबाकडून वेळोवेळी सपोर्ट मिळतच असतो पण, कामाच्या ठिकाणी महिलांना हा सपोर्ट मिळाला पाहिजे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens Day special Article about Working Woman And Work Place by Sharayu Kakade