Radio Day Special : आव्वाSSSज रेडिओचा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

आज जागतिक रेडिओ दिन आहे. हे असले दिन नेमकं कोण ठरवतं? हा प्रश्‍न मला नेहमीच पडतो. सहसा एखाद्या स्तब्ध बुधवारी दुपारी. नेहमीपेक्षा तीव्र पिंपल्सने ग्रासलेला एखादा १५ वर्षांचा दीन बालक, आता चार दिवस घराबाहेर पडताच येणार नाही म्हटल्यावर वेळ घालवायला असले दिन आणि दिवस यांचा आविष्कार करत असावा, अशी माझी समजूत होती.

माहितीचा विश्‍वासार्ह स्रोत आजही रेडिओ आहे. रेडिओ माध्यमातील बदलांवर जागतिक रेडिओ दिनानिमित्त लिहिताहेत आरजे संग्राम, ९५ बिग एफएम!

आज जागतिक रेडिओ दिन आहे. हे असले दिन नेमकं कोण ठरवतं? हा प्रश्‍न मला नेहमीच पडतो. सहसा एखाद्या स्तब्ध बुधवारी दुपारी. नेहमीपेक्षा तीव्र पिंपल्सने ग्रासलेला एखादा १५ वर्षांचा दीन बालक, आता चार दिवस घराबाहेर पडताच येणार नाही म्हटल्यावर वेळ घालवायला असले दिन आणि दिवस यांचा आविष्कार करत असावा, अशी माझी समजूत होती.

भाषा शुद्ध-अशुद्ध कशी असू शकते?
पुणेरी शुद्ध मराठी किंवा पंजाबी लेहज्याची हिंदी सोडल्यास इतर मराठी, हिंदीचे प्रकार क्वचितच ऐकायला मिळतात. एकाच दृष्टिकोनातून सगळे कार्यक्रम तयार होतात. समाजातील एकाच स्तरातील लोकांची गोष्ट पुढे येते, तोच dominant narrative ठरतो. भाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध कशी असू शकते? चूक-अचूक एक वेळ ठीक आहे; पण ‘शुद्ध’ म्हटल्यावर एकतर पाणी, नाहीतर जात याबद्दल आपण बोलत असतो ! या शुद्ध-अशुद्ध, शहरी-ग्रामीण वादामुळे, चौकटीमुळे अनेकांचा आवाज स्वतःकडूनच दाबला जातो. एकवेळ निहलानी काका परवडले; पण ही न्यूनगंडाची सेल्फ सेन्सरशिप महाअत्याचारी असते. दुसरी बाजू. याचा अर्थ सगळ्या रेडिओवाल्यांनी ठरवून, जाणून-बुजून, षड्‌यंत्र रचून हे केलेलं आहे असं नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘डे’ ठरवायला राष्ट्रसंघाच्या कमिट्या...
एकदा खात्री करून बघावं म्हटलं. शेवटी खासगी जीवनात कितीही पूर्वग्रहदूषित असलो तरी, सार्वजनिक मांडणी करताना काळजी घेतो. न घ्यायला मी काय व्हॉट्‌सॲप युनिव्हर्सिटीचा cool गुरू थोडीच आहे. थोडं खोलात जाऊन बघितलं आणि छोटा धक्काच बसला. हे ‘डे’ ठरवायला संयुक्त राष्ट्रांच्या मोठमोठ्या कमिट्या स्थापित होतात, मीटिंगा होतात, सर्वसाधारण सभेत ठरावबिराव मांडून पास करावा लागतो ! भारतीय नोकरशाहीला लाजवेल एवढ्या फायली या टेबलवरून त्या टेबलवर जातात; पण या सगळ्या लाल फितीतून एक चांगली गोष्ट नक्कीच बाहेर आली आहे. माझ्या उपजीविकेच्या माध्यमाची महती गायिली जातीये. 

महिलांची संख्या चांगली
ज्या संस्थेची स्थापनाच ‘विश्‍वशांती’सारख्या उद्देशासाठी झाली, त्यांची रेडिओकडून विविधता वगैरे अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. १८ वर्ष खासगी एफएम वाहिन्यांमध्ये काम केल्यानंतर, ही अपेक्षा जेवढी रास्त आहे, तितकीच जास्त आहे असं मी ठामपणे सांगू शकतो. रेडिओमध्ये महिलांची संख्या चांगली आहे, खासकरून क्रिएटिव्ह पोस्टसाठी. सेल्समध्ये हा आकडा वाढवण्याची गरज आहे.

इतर निकषांवर मात्र आम्ही खूप मागे आहोत. पुरोगामी महाराष्ट्रात, बहुजन समाज हा रेडिओमध्ये पुरेसा दिसत नाही. याची कारणं बहुचर्चित आहेत, आणि त्याचं नव्याने विवेचन करणं, या लेखात शक्‍य नाही. विविधतेचा अभाव असला की त्याचा परिणाम माध्यमावरील कार्यक्रमात दिसल्याशिवाय राहत नाही.

रेडिओ कर्मचाऱ्यांतही असावी विविधता
जगातलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं प्रसार माध्यम वगैरे म्हणूनच नाही, तर दरवर्षी तोच-तोच डे येणार म्हणून नावीन्य म्हणून केलेल्या ‘थिम्स’. यंदा ‘डायव्हर्सिटी’ किंवा विविधता, भिन्नता हा माझा आवडता विषय UN ने निवडलाय. सर्व जाती-धर्माचे, पंथांचे, प्रांतांचे, लिंगांचे (फक्त दोन नाही बरका!), विचारांचे, लैंगिक (एडिट ः preferences अर्थी politically correct शब्द) या सगळ्यांचा आवाज म्हणून रेडिओने काम केलं पाहिजे. या सगळ्यांच्या अपेक्षा, आकांशा, स्वप्न आणि चिंता यावर कार्यक्रम झाले पाहिजे आणि समाजातील विविधता, रेडिओच्या कर्मचाऱ्यांमध्येसुद्धा असली पाहिजे.

पूर्वग्रह समजून घ्या!
लहानपणापासून झालेलं आपलं सोशल scripting- आई-वडील, धार्मिक विधी, सण, नातेवाईक, शिक्षक, इतर विद्यार्थी, घरच्या कामवाली बाई, शाळेतील सफाई कामगार, महापालिकेचे कर्मचारी, भिक्षेकरी, घरातली लग्न या सगळ्यांतून आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो. आपली प्रत्येक कृती ही आपण स्वतः विचार करून, खरं-खोटं, चांगलं-वाईट तोलून मग करतो, घडवून आणतो, हा भ्रम आहे असं विज्ञानानं सिद्ध केलं आहे. यावर उपाय ? आपले पूर्वग्रह समजून घ्या. आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांशी दोस्ती करा. हिंदू असाल तर मुस्लिम बांधवांच्या घरी जा. आंतरजातीय विवाह केला तरच जातीय अंतर कमी होईल. वेगवेगळ्या मत प्रवाहांचा अभ्यास करा. आणि हो, रेडिओवर विविधता हवी, असा आग्रह धरा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Radio Day Special