सोशल मीडियावरचं गाजलेलं... (योगेश दामले)

योगेश दामले damle.yogesh@gmail.com
रविवार, 29 जानेवारी 2017

‘ओळखलंत का भाऊ मला?’

‘ओळखलंत का भाऊ मला?’ रिक्वेस्ट पाठवे कोणी
प्रोफाइल पिकवर जॉन, हृतिक, सचिन किंवा धोनी

ॲक्‍सेप्ट केलं, ॲड केलं, क्षणभर त्याला पाहून
फ्रेंड्‌स लिस्टमध्ये घुसल्यावर संवाद गेला राहून

‘चड्डीबड्डी’ मित्रासारखा प्रोफाइलवरती नाचला
अर्धे मित्र बळकावले, बॉस मात्र वाचला!

‘स्टेटस’ वाचले, ‘कोट’ ढापले, होते नव्हते नेले
‘संता-बंता’ ‘सुविचार’मध्ये ‘टॅग’ तेवढे केले...

वैतागून या असल्यांची आता यादी करीन म्हणतो,
सुटी लागता फ्रेंड्‌स लिस्टवरचा गाळ काढीन म्हणतो

टोमणा माझा झोंबल्यावरती हसत हसत उठला
फुटकळ फुटकळ पोस्ट्‌सनाही ‘लाइक’ करत सुटला

भंगार झाली वॉल, तरी मोडला नाही कणा
थातूरमातूर अपलोड्‌सनाही, फक्त ‘लाइक’ म्हणा!

- कुसुमाग्रजांची माफी मागून-विनयानुज

Web Title: yogesh damle's social media coloum in saptarang

टॅग्स