आता 'बाबा' झाल्यावर मिळणार 26 आठवड्यांची रजा! Zomato चा निर्णय

Pregnancy
Pregnancy

करिअर : मातृत्त्वानंतर नोकरी सोडण्याचं वाढतं प्रमाण पाहता आता 'झोमॅटो'नं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या कंपनीने आता त्यांच्या धोरणातच बदल केले आहेत आणि त्यानुसार, आता 'झोमॅटो'मध्ये 26 आठवड्यांची पगारी रजा दिली जाणार आहे. 'झोमॅटो' एकूण 13 देशांमध्ये आहे आणि प्रत्येक देशात मातृत्त्वाच्या रजांसंदर्भात असलेल्या नियमांचेही पालन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, हेच धोरण पुरुष कर्मचाऱ्यांसाठीही लागू केले जाणार आहे. म्हणजेच, 'झोमॅटो'मध्ये 26 आठवड्यांची पितृत्त्व रजा मिळणार आहे. 

'झोमॅटो'चे संस्थापक दिपेंदर गोयल यांनी एक ब्लॉग लिहून भूमिका स्पष्ट केली आहे. 'पालकांसाठीच्या रजेमध्ये समानता नसणे हे महिलांच्या काम सोडण्याचे किंवा मोठ्या जबाबदाऱ्या न स्वीकारण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. सध्याच्या नियमांनुसार, सुदृढ कुटुंब आणि चांगले करिअर या दोन्ही गोष्टी साध्य करणे महिलांसाठी अवघड आहे. अनेक महिला प्रसुतीनंतर नोकरी सोडण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे संस्थेमध्ये महिला-पुरुषांचे प्रमाण व्यस्त होऊ लागले आहे. यावर तोडगा काढणे गरजेचे आहे', असे गोयल यांनी त्यात लिहिले आहे. 

'झोमॅटो'च्या नव्या धोरणात काय आहे? 
- सरोगसी किंवा दत्तक मुला/मुलीच्या पालकांनाही या रजा लागू होणार 
- प्रत्येक बाळामागे एक हजार डॉलरचा बोनस देणार 
- गेल्या सहा महिन्यांमध्ये कुटुंबात नव्या बाळाचा समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही योजना लागू होणार आहे. 

आपल्याकडे असलेल्या पालकत्त्वांच्या धोरणात आणखी बदल होण्याची गरज वाटते का? तुमच्या कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये यासंदर्भातील तुमचे अनुभव काय होते? 
ई-मेल करा webeditor@esakal.com या आयडीवर आणि सब्जेक्‍टमध्ये लिहा 'पालकत्त्व' !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com