सातारा : दोन वर्षांमध्ये ११६ गुंड हद्दपार

कऱ्हाड शहरसह उंब्रज पोलिसांची बाजी
Maharashtra Police
Maharashtra PoliceSakal

कऱ्हाड - गुन्हेगारांच्या टोळ्यांवर वचक राहावा, यासाठी पोलिसांनी हद्दपारीचे हत्यार बाहेर काढले आहे. कऱ्हाड तालुक्यात तब्बल ११६ गुंडांना हद्दपार केले आहे. पोलिस कारवाईने तालुक्यातून हद्दपार झालेल्यांची संख्या वाढतच आहे. हद्दपारीत उंब्रज पोलिसांनी बाजी मारली आहे. त्यांच्याकडून दोन वर्षांत ६५ जणांना, तर कऱ्हाड शहर पोलिसांकडून ४७ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. कऱ्हाड तालुका पोलिसांकडून अद्यापही दोन टोळ्यांचे प्रस्ताव पाठवले आहेत. तळबीड पोलिस ठाण्यातून एकही संशयित हद्दपार झालेला नाही.

गुन्हेगारी अभिलेख व त्यांच्या गुप्त हालचालींवर लक्ष ठेवून कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारी टोळ्यांचे मुळावर कायदेशीर घाव घालण्यासाठी पोलिसांनी हद्दपारीच्या कारवाईची तलवार बाहेर काढली आहे. त्यामुळे त्याची धास्ती घेऊन अनेक जण भूमीगतही झाले आहेत. कऱ्हाड तालुक्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईने ११६ जणांवर हद्दपार होण्याची वेळ आली आहे. त्यात उंब्रज पोलिसांनी चांगलीच बाजी मारली आहे. त्या खालोखाल कऱ्हाड शहर पोलिसांचीही कामगिरी चांगली आहे. तालुका पोलिसांना केवळ चौघांना हद्दपार करता आले आहे. अद्यापही दोन टोळ्यांच्‍या प्रस्तावावर निर्णय नाही. त्यात आठ जणांचा समावेश आहे. तळबीड पोलिस मात्र हद्दपारीच्या कारवाईला अपवाद ठरले आहेत. त्यांच्या हद्दीतून एकही संशयित हद्दपार झालेला नाही, हेच वैशिष्ट्य आहे. उंब्रज पोलिसांनी ६० जणांना हद्दपार केले आहे. त्यामध्ये ‘मोका’चे दोन प्रस्ताव, ५५ ‘मपोका’चे प्रस्ताव, ११ अन्य प्रस्ताव अशा ६० जणांवर वेगवेगळ्या गुन्‍ह्यांतर्गत हद्दपारीची कारवाई झाली आहे. अद्यापही सात प्रस्ताव बाकी आहेत. कऱ्हाड शहर पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांच्या टोळ्यांना दणका दिला आहे. दोन गुन्हेगारी टोळ्यांतील ४७ जणांना हद्दपार केले आहे. शहर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांतील अनेकांवर लक्ष ठेवत त्यांना सूचना दिल्या. मात्र, त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने त्या टोळक्यांच्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शहरातील ४७ जणांना दोन वर्षांत शहरातून हद्दपार केले आहे. तालुका पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांतील चार संशयितांना हद्दपार केले आहे. अद्यापही दोन टोळ्यांवर प्रस्ताव बाकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com