Political News : 'सिद्धेश्वर'कडून शेतकरी पॅनेलचा दारूण पराभव

Shambhuraj Desai-Makarand Patil
Shambhuraj Desai-Makarand Patilesakal
Summary

सोसायटीच्या निवडणुकीत चुरशीने मतदान झाले.

शिरवळ : पळशी (ता. खंडाळा) येथील विकास सेवा सोसायटीमध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील (Nitin Bhargude-Patil) यांच्या नेतृत्वाखालील सिद्धेश्वर शेतकरी सहकार पॅनेलने (Siddheshwar Shetkari Sahakar Panel) शेतकरी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा (Shetkari Gramvikas Panel) दारूण पराभव करत सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. एक जागा बिनविरोध झाली होती. या सोसायटीवर ‘शेतकरी’ने १३-० असे वर्चस्व मिळवले.

पळशी विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये (Palashi Vikas Seva Society Election) १२ जागांसाठी चुरशीने मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानानंतर मतमोजणी केंद्रावरच मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये सिद्धेश्वर शेतकरी सहकारी पॅनेलचे मधुकर भरगुडे, नवनाथ भरगुडे, शामराव भरगुडे, बाळू चव्हाण, दत्तात्रय जाधव, हरिश्चंद्र जाधव, सिद्धेश्वर राऊत, महादेव यादव, सुनील कांबळे, तुकाराम दगडे, सुशीला भरगुडे, सुनीता ढम, ज्योती साळी हे उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल क्षीरसागर व ज्ञानेश्वर चव्हाण यांनी काम पाहिले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

Shambhuraj Desai-Makarand Patil
'शरद पवारांचा तो शब्द अन् अवघ्या 1 मतानं वाजपेयी सरकार कोसळलं'

सिद्धेश्वर शेतकरी सहकारी पॅनेलच्या प्रचाराची धुरा पळशीचे सरपंच हेमा गायकवाड, उपसरपंच एकनाथ भरगुडे, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, मिरजेचे सरपंच सारिका जाधव, उपसरपंच राजू मांढरे व कार्यकर्त्यांनी समर्थपणे सांभाळली. विजयी उमेदवारांचे आमदार मकरंद पाटील (Makarand Patil), गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, मनोज पवार, राजेंद्र तांबे आदींनी अभिनंदन केले.

Shambhuraj Desai-Makarand Patil
'चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याची नोंद घेण्याची गरज नाही'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com