esakal | कोळकीत 14 लाखांची घरफोडी; शिक्षिकेच्या घरातून पळविले 61 तोळे दागिने
sakal

बोलून बातमी शोधा

thieft

कोळकीत 14 लाखांची घरफोडी; शिक्षिकेच्या घरातून पळविले 61 तोळे दागिने

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर : फलटण शहराचे उपनगर म्हणून ओळख आसलेल्या कोळकी ता. फलटण येथील शारदानगर येथील एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या बंद घरातुन आज्ञात चोरट्यांनी तीचे व तीच्या बहिणीचे १४ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे ६१ तोळे सोन्याचे दागीने लंपास केले आहेत. या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

कोळकी गावातील शारदानगर येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती कस्तुरा सिताराम माळी वय ६३ या आपल्या भाच्याकडे मार्डी ता. माण येथे गेल्या होत्या, त्यामुळे त्यांचे घर बंद होते. शुक्रवार ता. १० सप्टेंबरच्या सायंकाळी सात ते ११ सप्टेंबर रोजीच्या सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या बंद घराचे खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश करुन त्यांचे व त्यांची बहिण सौ. शकुंतला सिताराम माळी यांचे सोन्याचे दागीने चोरुन नेले.

या घरफोडीत चोरट्यांनी कस्तुरा माळी यांचे चार हजार ३८० रुपये किंमतीचे टॉप्स, सहा हजार ३०० रुपये किंमतीचे टॉप्स, सतरा हजार ३०० रुपये किंमतीचे बदाम व अंगठी, नउ हजार २०० रुपये किंमतीची अंगठी, दहा हजार ४०० रुपये किंमतीची कानातील चैन, दोन हजार ७७४ रुपये किंमतीचे कानातील झुबे व अंगठी, पाच हजार १२ रुपये किंमतीची कानातील खड्याचे टॉप, एक हजार ६६७ रुपये किंमतीचे झुबे व फुले, नऊ हजार १०० रुपये किंमतीचे टॉप, पाच हजार ४०० किमतीचे झुबे,  सातहजार २७६ किमती कानातले टॉप्स, पाच हजार ९०० किमतीचे कानातले, आठ्ठावीस हजार ६२० किमतीचे झुबे, २४ हजार ५७८ किंमतीचे झुबे, ७ हजार ९०० किमतीचे कानातले टॉप, ४ हजार ४०० किमतीचे टॉप्स, एक लाख ७१ हजार ६०० रुपये किमतीच्या दोन पाटल्या, एक लाख ७६ हजार ६०८ रुपये किंमतीच्या चार बांगड्या, एक लाख ७५ हजार ३१४ किंमतीचे चार गोठ, १९ हजार १७० किंमतीची अंगठी, १५ हजार ७२० किंमतीची अंगठी, १४ हजार २०० रुपयांचे झुबे, ६ हजार ४० रुपयांची कानातील फुले

हेही वाचा: इंदिरा गांधींना अपात्र ठरवल्याचा निर्णय साहसी होता - सरन्यायाधीश

९४ हजार ५०० रुपये किंमतीचे गंठण, ९१ हजाराचे गंठण, एक लाख ६१ हजार ६४५ किमतीचा राणीहार, ४ हजाराचे पेंडल, २ हजार ६४४ रुपयांचे कानातले टॉप्स, ६०९ रुपयांची फुले, ३ हजार ८१ रुपयांचे टॉप्स, २ हजार ३० रुपयांची अंगठी, १४ हजार ५१०रुपयांचे नेकलेस, २ हजार ५३१ रुपयांची वेढणी, १५ हजार ६२३ रुपयांची मोहनमाळ, ९९६ रुपयांचे कानातले टॉप, १२ हजार ३२७ रुपयांची गळ्यातील चैन, १० हजार ३६४ रुपयांचा लक्ष्मीहार असा एकुण आकरा लाख ८६ हजार १८९ रुपयांचे दागीने तर त्यांची बहिण सौ. शकुंतला माळी यांचे ४० हजाराचे गंठण, ४० हजारांचा लक्ष्मीहार, २० हजार किमतीच्या दोन अंगठ्या, ३० हजारांची  गळ्यातील  चैन, ६० हजाराचे गंठण, ४० हजार किमतीची मण्याची माळ, २० हजाराचे कानातले असा अडीच लाख रुपये किमतीचे व दोघींचे मिळून एकुण चौदा लाख ३६ हजार १८९ किमतीचे सोन्याचे दागीने लंपास केले आहेत.

हेही वाचा: ठरलं! शिवसेना उत्तर प्रदेशात लढवणार सगळ्या जागा

या प्रकरणी श्रीमती कस्तुरा सिताराम माळी यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. पुढील तपास सपोनि एस. के. राउळ हे करीत आहेत. दरम्यान सदर चोरीतील दागीण्यांची किंमत तत्कालीन पावतीनुसार १४ लाख रुपये होत असली तरी आजच्या सोन्याच्या भावानुसार ती किंमत कोट्यावधी रुपयांच्या घरात जात आहे. या घटनेमुळे कोळकीमध्ये भितीचे वातावरण असून पोलिस यंत्रणेने तातडीने यातील आरोपींना जेरबंद करावे अशीमागणी होत आहे.

loading image
go to top