झेडपीत आत्तापर्यंत 663 कर्मचारी बाधित, 619 कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात!

प्रशांत घाडगे
Saturday, 17 October 2020

जिल्हा परिषदेत गेल्या पाच महिन्यापासून कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. यामधील सामान्य प्रशासन, रोजगार हमी, बांधकाम, अर्थ, समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत विभाग यासह इतर विभागात बाधित रुग्णांची संख्या आहे.

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असलेले 663 कर्मचारी अद्यापपर्यत कोरोना बाधित झाले आहेत. तर, आतापर्यत दहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 619 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. याचबरोबर, सद्यस्थितीत 34 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहे. सध्याची बाधित रुग्ण संख्या बघता जिल्हा परिषदेत रुग्ण संख्या आटोक्‍यात आल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हा परिषदेत गेल्या पाच महिन्यापासून कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. यामधील सामान्य प्रशासन, रोजगार हमी, बांधकाम, अर्थ, समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत विभाग यासह इतर विभागात बाधित रुग्णांची संख्या आहे. याचबरोबर, विविध विभागातील कर्मचाऱ्यांसह अधिकारी, पदाधिकारी कोरोना बाधित झाले आहेत. सध्यस्थितीत कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेत विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्या बाधित रुग्णांची सख्या 34 असल्याने मागील काही दिवसांच्या तुलनेत आता जिल्हा परिषदेत रुग्ण संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे.

मागील चार महिन्यात सातारा तालुक्‍यात 128, कराड 111, कोरेगाव 99, वाई 48, पाटण 74, खटाव 53, माण 27, खंडाळा 29, फलटण 36, महाबळेश्‍वर 33, जावळी तालुक्‍यात 25 बाधित रुग्ण आढळलेले आहेत. तसेच, जिल्हा परिषदेच्या एकूण 619 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये, सातारा तालुका 122, कराड 108, कोरेगाव 95, वाई 43, पाटण 67, खटाव 45, माण 23, खंडाळा 29, फलटण 31, महाबळेश्‍वर 33, जावळी 23 अशी रुग्ण संख्या आहे. दरम्यान जिल्हा परिषदेत काम करणाऱ्यांमध्ये आतापर्यत सातारा तालुक्‍यातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून सातारा, खटाव तालुका दोन, कोरेगाव, फलटण, जावळी तालुक्‍यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती, जिल्हा परिषदेने दिली आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 663 staff corona patients have been found in Satara Zilla Parishad