
स्वातंत्र्यपुर्व काळात दादासाहेब उंडाळकरांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलेले योगदान तरुण पिढीपर्यंत पोहचले पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
"टिळकांनी घातलेल्या पायावर गांधींनी कळस चढवला"
कऱ्हाड (सातारा): भारतीय स्वातंत्र्याचा पाया लोकमान्य टिळक यांनी घातला. त्यावर कळस चढवण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची सर सुराज्याला नाही, हे तत्व घेवून लोकांत जनजागृती करुन ब्रिटीशांविरोधात उठाव केला. त्याला मुर्तरुप गांधींनी दिले. स्वातंत्र्यपुर्व काळात दादासाहेब उंडाळकरांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलेले योगदान तरुण पिढीपर्यंत पोहचले पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा: सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वरसह 'या' पालिकांसाठी लवकरच 'रणधुमाळी'
स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने कऱ्हाड (जि.सातारा) येथे लोकमान्य टिळक या मराठी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन डॉ. मोरे, पत्रकार विनोद शिरसाठ, उंडाळकर स्मारक समितीचे कार्यवाह अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, माजी प्राचार्य गणपतराव कणसे आदींची हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. ज्ञानोबा-तुकाराम यांचा उल्लेख आल्यावर सर्व संताचा सहभाग येतो, त्याप्रमाणे स्वातंत्र्याचा सार सांगायचा झाल्यास लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या दोन नावांच्यामध्ये स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचा सहभाग येतो, असे सांगून डॉ. मोरे म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी ब्रिटीश हे भारताला लुटण्यासाठी आले आहेत. त्यांना परतवून लावून स्वातंत्र्य मिळावे, यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी लोकांत जनजागृती केली. त्यांच्या या ब्रिटीशांविरोधातील कारवायामुळे त्यांना मंडालेच्या तुरुगांत सहा वर्षे शिक्षा देण्यात आली. ती शिक्षा भोगून पुन्हा सहा वर्षे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले.
हेही वाचा: कऱ्हाड, सांगली, कोकणातून 45 लाखांची दारू जप्त
लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची सर सुराज्याला नाही, हे तत्व घेवून लोकांत जनजागृती करुन ब्रिटीशांविरोधात उठाव केला. ब्रिटिशांनी भारताचे जेवढे शोषण केले तेवढे शोषण कुठल्या देशाचे झालेले नाही हे टिळकांनी ओळखले होते. त्यांचे विचार घेवून महात्मा गांधीनी पुढे स्वातंत्र्याची चळवळ सक्षम केली. त्यामुळे टिळकांनी स्वातंत्र्याचा पाया रचला आणि त्यावर कळस गांधींनी चढवला. श्री. शिरसाट म्हणाले, लोकमान्य टिळक यांच्यावर इंग्रजी भाषेमध्ये ग प्र प्रधान व एके भागवत यांनी त्या काळात लिहिलेले चरित्र आज मराठीत अनुवादत करण्यात आले. त्याचे उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने प्रकाशन होत आहे, ही गौरवास्पद बाब असल्याचे सांगितले. अॅड. उंडाळकर यांनी विलासकाका उंडाळकर यांच्या विचारावर वाटचाल सुरु असून उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने प्रबोधनाचे काम पुढे नेण्यात येईल, असे सांगितले. प्राचार्य कणसे यांनी आभार मानले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
Web Title: A Book On Lokmanya Tilak Has Been Published In Karhad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..