नव्या पिढीच्या वैचारिक भूमिकेने आनंद : डॉ. आ. ह. साळुंखे

आ. ह. साळुंखे जीवन आणि भूमिका चरित्रलेखन पुस्तकाचे प्रकाशन
A. H. Salunkhe
A. H. SalunkheSakal

सातारा : नवीन पिढी समाजात विवेकी व वैचारिक भूमिका मांडत असल्याचा आनंद आहे. ही भूमिका समाजात तरुणांनी रुजवली पाहिजे, असे ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सांगितले. डॉ. प्रशांत गायकवाड लिखित लोकायत प्रकाशनचे 'सत्य-असत्याशी मन केले ग्वाही (आ. ह. साळुंखे जीवन आणि भूमिका)’ या चरित्रलेखन पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नवनाथ शिंदे होते. या वेळी राकेश साळुंखे, डॉ. प्रशांत गायकवाड उपस्थित होते. डॉ. साळुंखे म्हणाले, ‘‘गोतम बुध्दांचे धम्मदान सर्वांत श्रेष्ठ असून, विवेकाला साक्षी ठेऊन काम करावे लागत आहे. माझ्या भूमिकेवर पुस्तक लिहिल्याने आनंद होत आहे. आमच्या मावळत्या काळानंतर समाजात नवीन तरुणांनी विवेकी व वैचारिक विचार रुजविले पाहिजेत.''

डॉ. गायकवाड म्हणाले, ‘‘डॉ. साळुंखे यांचे चरित्र लोकांसमोर आणण्यासाठी पुस्तकाचे लेखन केले. त्यांचा अभ्यास, व्यासंग किती आहे, याचा अनुभव पुस्तक लिहिताना आला. मितभाषी, सुसंस्कृत असणारे तात्यांचे विवेकी विचार पक्के असून, त्यांचे लिखाण समाज घडविण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यांच्या विचारातून परिवर्तन घडत असून, त्यांची पुस्तके दिशा देणारी आहेत. त्यांचा विचार व भूमिका घेऊन साहित्यिकांना पुढे यावे लागणार आहे." श्री. शिंदे म्हणाले,‘‘आ. ह. साळुंखे यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांची समतेची विचारधारा आयुष्यभर निष्ठेने जपली. समाजाला समृद्ध करणारे त्यांचे विचार व लेखन आहे."

नवनाथ शिंदे म्हणाले,"अपार संवेदना असलेला माणूस म्हणजे डॉ. साळुंखे आहेत. त्यांनी भावी पिढीवर केलेल्या उपकाराला भारतीय इतिहासात तोड नाही. त्यांचे विचार पुढील अनेक पिढ्यांना दिशादर्शक व मार्गदर्शक ठरतील." प्रा. मानसी लाटकर, रोहित साळुंखे, सागर शिंगणे, पुलकेशी साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. अमित जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा.अमृत साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी दीपक ढाणे, प्रशांत गुजर, विकास धुळेकर, सचिन सुशील, उदय चव्हाण, केतन जाधव, डॉ. गीता पोळ, विजय लाटकर, सुनील पाटील, प्रा. ढवळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com