खातेदार, ग्राहकांना पेमेंटब्रिज सिस्टिम उपयुक्त ठरणार : चेतना सिन्हा

सल्लाउद्दीन चोपदार | Sunday, 11 October 2020

माणदेशी बॅंकेत नेहमी ग्राहकांच्या हिताचे विविध उपक्रम राबविण्यात येतात. संचालक मंडळाच्या प्रयत्नातून बॅंकिंग प्रणालीमध्ये वेगवेगळे नवीन बदल घडवून ते आपल्या खातेदारांना देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्याचे एक पुढचे पाऊल म्हणजे एपीबीएस सिस्टिम म्हणजे आधार पेमेंटब्रिज सिस्टिममुळे केंद्र व राज्य शासनांतर्गत विविध योजनांतून मिळणाऱ्या अनुदानासाठी यापुढे माणदेशी बॅंकेच्या खातेदारांना महिला बॅंकेचाच खाते क्रमांक देता येणार आहे.

म्हसवड (जि. सातारा) : माणदेशी महिला सहकारी बॅंकेत नव्याने आधार पेमेंटब्रिज सिस्टिम सुरू करण्यात आली असून, बॅंकेचे खातेदार, ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅंकेच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी केले आहे. 

माणदेशी बॅंकेत नेहमी ग्राहकांच्या हिताचे विविध उपक्रम राबविण्यात येतात. संचालक मंडळाच्या प्रयत्नातून बॅंकिंग प्रणालीमध्ये वेगवेगळे नवीन बदल घडवून ते आपल्या खातेदारांना देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्याचे एक पुढचे पाऊल म्हणजे एपीबीएस सिस्टिम म्हणजे आधार पेमेंटब्रिज सिस्टिममुळे केंद्र व राज्य शासनांतर्गत विविध योजनांतून मिळणाऱ्या अनुदानासाठी यापुढे माणदेशी बॅंकेच्या खातेदारांना महिला बॅंकेचाच खाते क्रमांक देता येणार आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या शासकीय योजनांच्या लाभार्थींना अनुदान महिला बॅंकेच्या खात्यावर जमा होऊ शकणार आहे. त्यासाठी अन्य राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा बॅंकेचा खाते क्रमांक यापुढील काळात देण्याची गरज भासणार नाही. 

शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांना आधार; गैरप्रकारांना बसणार चाप!

माणदेशी बॅंकेचे खातेदार आपल्या माणदेशी बॅंकेचा खाते क्रमांक कोणत्याही प्रकारच्या अनुदानासाठी देऊ शकतात. मग ते गॅस अनुदान असो, संजय गांधी निराधार योजना असो अथवा पीएम किसान योजना असो अशा अन्य प्रकारच्या शासकीय योजनांचे अनुदान आपल्या माणदेशी बॅंकेत जमा होऊ शकते. शिवाय यासाठी दोन-तीन बॅंकेची खाती सांभाळावी लागणार नाहीत व भल्या मोठ्या रांगेत तासन्‌ तास रांगेत ऊभे राहण्याची वेळ "माणदेशी'च्या खातेदारांवर येणार नाही. माणदेशी बॅंकेची आरटीजीएस व एनइएफटीसंदर्भातील "होस्ट टू होस्ट' सिस्टिमसुद्धा सुरू झाली आहे. यामुळे माणदेशी बॅंकेच्या खातेदारांना पैसे पाठवण्याची तसेच पैसे मिळवण्याची सुविधा जलद गतीने उपलब्ध होणार असल्याची माहिती श्रीमती सिन्हा यांनी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे