साताऱ्यात 'अभाविप' आक्रमक; अब्दुल सत्तारांचा निषेध, उदय सामंतांच्या राजीनाम्याची मागणी

उमेश बांबरे
Friday, 28 August 2020

नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शुल्काच्या जास्तीत जास्त 15 टक्के शुल्क घेऊन प्रवेश द्यावा, उर्वरित शैक्षणिक शुल्क हे चार टप्प्यात घ्यावे. स्वायत्त विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठित करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

सातारा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर धुळे येथे पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा व अलिशान कारमध्ये बसून बघ्याची भूमिका घेणाऱ्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा येथे निषेध नोंदविण्यात आला. परिषदेच्या येथील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून श्री. सत्तार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा 

धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री श्री. सत्तार यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अमानुषपणे लाठीमार, बुक्‍क्‍यांचा मारा केला होता. या घटनेचा "अभाविप' च्या येथील कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच श्री. सत्तार व सामंत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. अलिशान कारमध्ये बसून केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या सत्तार यांनी राजीनामा द्यावा. राज्यातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे वचन देऊन नापास करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

लॉकडाउनमध्ये या योजनेने तारले गरिबांना, वाचा सविस्तर
 
तसेच कोरोना महामारीत अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांकडून या सत्राचे शुल्क घेण्यात आले आहे, ते परत करावे. तसेच 2020-21 या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात 30 टक्के कपात करावी, सरासरीच्या सूत्रामुळे चुकीच्या पध्दतीने लावलेल्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करावे.

पुण्यातील एकासह साताऱ्यातील वकीलावर गुन्हा; निघाले हाेते महाबळेश्वरच विकायला

नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शुल्काच्या जास्तीत जास्त 15 टक्के शुल्क घेऊन प्रवेश द्यावा, उर्वरित शैक्षणिक शुल्क हे चार टप्प्यात घ्यावे. स्वायत्त विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठित करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

रेल्वे मालधक्‍क्‍याच्या माथाडी कामगारांना मिळाले तीन हजारांचे अनुदान

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ABVP Demands Resignation Of Minister Uday Samant Abudul Sattar In Satara