लाचप्रकरणी भूमापकासह वाघेरीतील एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाचप्रकरणी भूमापकासह वाघेरीतील एकास अटक

लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पथकातील पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार संजय साळुंखे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, तुषार भोसले, नीलेश येवले यांनी सापळा रचून कारवाई केली.

लाचप्रकरणी भूमापकासह वाघेरीतील एकास अटक

कऱ्हाड : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापकासह त्याला त्याच्या कामात मदत करणाऱ्या खासगी मदतनीस अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयाने 10 हजारांची लाच घेताना पकडले. जमिनीवर वारसदार म्हणून नोंद करून देण्यासाठी त्या दोघांनी 13 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील 10 हजार रुपये देताना त्यांना अटक झाली. वैभव चंद्रकांत पाटील, (वय 37 रा. साई रेसिडेन्सी, मलकापूर) व त्याचा खासगी मदतनीस श्रीधर माने (25, रा. वाघेरी) अशी दोघांची नावे आहेत.
 
येथील शनिवार पेठेतील एका तक्रारदाराच्या चुलत चुलत्यांच्या सर्व्हे क्रमांक 61 ब, व 61 क, असा शनिवार पेठेतील मिळकतीवर वारस नोंद करायची होती. त्याची नोंद करून देण्यासाठी वैभव पाटील व त्याचा खासगी मदतनीस श्रीधर माने यांनी त्याच्याकडे 13 हजारांचा लाचेची मागणी केली. त्यानुसार तडजोड झाली. त्यात 10 हजारांची लाच देण्याचे ठरले. त्याबाबत संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. ठरलेली रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचला. त्यात दोघेही ती रक्कम स्वीकारताना दोघांना पकडण्यात आले.

अण्णासाहेब पाटील महामंडळ बरखास्तीसाठी राष्ट्रवादीचा हात : नरेंद्र पाटील
 
लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पथकातील पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार संजय साळुंखे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, तुषार भोसले, नीलेश येवले यांनी सापळा रचून कारवाई केली. त्याबाबत शहर पोलिसात बुधवारी गुन्हा नोंद झाला आहे. दोघांनाही अटक झाली आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Chandrakant PatilMalkapur
loading image
go to top