काळ आला होता, पण वेळ नाही! रेल्वे गेटमनचे प्रसंगावधान, अनेकांचे वाचविले प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळ आला होता, पण वेळ नाही! रेल्वे गेटमनचे प्रसंगावधान, अनेकांचे वाचविले प्राण

कोपर्डे परिसरातील ऊस गळीतास निघालेल्या बैलगाडीने रेल्वे रूळ क्राॅस करत पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रेल्वे रुळाच्या मध्यभागी आल्यानंतर बैलगाडीचे चाक रुळात अडकले. ती घटना घडल्यानंतर काही वेळाने त्या रूळावरून पुण्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर यशवंतपूर अजमेरची वेळ झाली. ती एक्‍सप्रेस पॅसेंजर रेल्वे मिरजेहून पुण्याला निघाली होती.

काळ आला होता, पण वेळ नाही! रेल्वे गेटमनचे प्रसंगावधान, अनेकांचे वाचविले प्राण

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : कऱ्हाड ते मसूर दरम्यानच्या कोपर्डे हवेलीनजीक रेल्वेचे गेट पास करताना बैलगाडीचे चाक अचानक रेल्वेच्या रुळात अडकले. त्यावेळी चाक तुटल्याने बैलगाडी रेल्वे रुळावर अडकून राहिली. त्याच दरम्यान यशवंतपूर ते अजमेर एक्‍सप्रेस ही पॅसेंजर रेल्वे मिरजवरुन पुण्याला निघाली होती. ती वेगाने तेथून पास होते. त्यावेळीच ती बैलगाडी अडकून होती. ती गोष्ट रेल्वे गेटमन पुंडलीक कटनळी यांच्या ती गोष्ट लक्षात आली. त्यांनी तातडीने रेल्वेला लाल बावटा दाखवत ती थांबवील. धावत जात त्यांनी रेल्वे थांबल्याने पुढील अपघाताची अनर्थ टळला. 

घनस्थळावरील माहितीनुसार, कोपर्डे हवेली येथील रेल्वे गेट क्रमांक 96 च्या दुपारी दोनच्या दरम्यान घटना घडली. कोपर्डे परिसरातील ऊस गळीतास निघालेल्या बैलगाडीने रेल्वे रूळ क्राॅस करत पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रेल्वे रुळाच्या मध्यभागी आल्यानंतर बैलगाडीचे चाक रुळात अडकल्याने ते तुटले. ती घटना घडल्यानंतर काही वेळाने त्या रूळावरून पुण्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर यशवंतपूर अजमेरची वेळ झाली. ती एक्‍सप्रेस पॅसेंजर रेल्वे मिरजेहून पुण्याला निघाली होती. कऱ्हाड-ओगलेवाडी रेल्वे स्थानकावरुन गेटमन कटनळी यांना गाडी सुटली असल्याचा फोन आला होता. गेट बंद करण्यासाठी जात असतानाच बैलगाडीचे चाक रूळात अडकून ती जागीच उभी आहे, याची वस्तूस्थिती पुंडलीक कटनली यांच्या लक्षात आळी. 

पुणे-बंगळूर महामार्गावर विचित्र अपघात; मालट्रक-जीपच्या धडकेत चौघे जखमी

त्यांनी त्याचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी त्याचक्षणी प्रसंगावधान राखून गेटमनचा लाल बावटा घेऊन सुमारे अर्धा किलोमीटर रुळावरून धावत ते रेल्वे येणार असल्याच्या दिशेने धावत सुटले. लाल बावटा दाखवल्यामुळे चालकाने रेल्वेचा वेग कमी करून हळूहळू रेल्वे थांबवली. तोपर्यंत दोन्ही बाजूने गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे रुळावरुन बैलगाडी बाहेर काढण्यासाठी सुमारे वीस मिनिटे लागली. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. त्यानंतर रेल्वे सोडण्यात आली. त्यामुळे काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती, या म्हणीची येथे प्रचिती आली. रेल्वे गेटमधील रस्ता अरुंद असल्याने छोटे मोठे अपघात होत असतात व वाहतूक कोंडी देखील नेहमीच होत असते. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे गेटच्या आतील रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्‍यक आहे.

रणजितसिंहांची घर वापसी; काँग्रेस पक्षात अनेकांचा ओघ वाढला, भाजपलाही हादरा 

अचानक घडलेल्या घटनेमुळे माझा गोंधळ उडाला, परंतु प्रसंगाचे गांभीर्य ओळखून लोकांच्या गर्दीतून वाट काढत लाल बावटा घेऊन रेल्वेच्या दिशेने धावत गेलो. रेल्वे दूर असल्यामुळे थांबण्यात यश आले आणि पुढील अनर्थ टळला. 

-पुंडलिक कटनळी, रेल्वे गेटमन, कोपर्डे हवेली 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satara
loading image
go to top