esakal | पुण्याहून साता-याला निघालात, थांबा! खंबाटकी घाटात झालाय माेठा अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याहून साता-याला निघालात, थांबा! खंबाटकी घाटात झालाय माेठा अपघात

ही घटना खांबाटकी घाटात लागलेल्या वणव्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली.

पुण्याहून साता-याला निघालात, थांबा! खंबाटकी घाटात झालाय माेठा अपघात

sakal_logo
By
अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : पुणे - बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या सातव्या वळणानजीक असलेल्या दत्तमंदिर कॉर्नर जवळ आज (बुधवार) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ट्रकने अचानक पेट घेतला. परिणामी या ट्रकच्या मागे असणा-या चार चाकी वाहनाने ही पेट घेतला. या घटनेत दाेन्ही वाहनांचे माेठे नुकसान झाले आहे. 

या घटनेत सुदैवाने कसलीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेची माहिती समजताच तत्काळ खंडाळा पोलिस कर्मचारी, भुईंज टॅब स्टाफ व हायवे कर्मचारी पाेचले. त्याचवेळेस भुईंजवरुन अग्निशामक दलासही पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली.

या घटनेमुळे खंबाटकी घाटात वाहनांची रांग लागली हाेती. दरम्यानच्या काळात पाेलिसांनी पुण्याहून साताराबाजुकडे जाणारी वाहतूक खंबाटकी बोगद्यातून विरुद्ध बाजूने वळवण्यात आली. ही घटना खांबाटकी घाटात लागलेल्या वणव्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली.

प्रेमीयुगुलांनो! तुम्हाला लुटणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड; सोलापूर, बारामतीतील सहा जणांना अटक

साता-यात सलग पाचव्या दिवशी काेराेनाचा विस्फाेट; दुस-या लाटेत 922 रुग्णांची भर, पाच बाधितांचा मृत्यू 

लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी उदयनराजेंनी 'महाविकास'ला सूचविली उपाययाेजना 

Honeymoon ला न जाता बायकोला अभ्यास करायला लावला अन् बायको PSI होताच नवऱ्यानं कडक सॅल्यूट ठोकला 

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top