esakal | ट्रॉलीखाली सापडल्याने बिजवडीचा युवक ठार

बोलून बातमी शोधा

ट्रॉलीखाली सापडल्याने बिजवडीचा युवक ठार

ट्रॉलीचे चाक डोक्‍यावरून गेल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत. 

ट्रॉलीखाली सापडल्याने बिजवडीचा युवक ठार
sakal_logo
By
राजेंद्र वाघ/भद्रेश भाटे

कोरेगाव (जि. सातारा) : उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन निघालेल्या ट्रॅक्‍टरच्या पाठीमागील ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून बिजवडी (ता. माण) येथील दुचाकीस्वार ठार झाला. कोरेगाव-पुसेगाव मार्गावर कुमठे फाट्यावरील वीट भट्टीसमोर हा अपघात झाला.
 
अभिजित भरत गोसावी (वय 28, रा. बिजवडी, ता. माण) असे मृताचे नाव आहे. यासंदर्भात पोलिस पाटील धनंजय गुलाबराव जगदाळे (रा. सद्‌गुरूनगर, कुमठे फाटा, कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. कोरेगाव-पुसेगाव मार्गाने कोरेगाव बाजूकडून उसाने भरलेल्या दोन ट्रॉली (पाठीमागील ट्रॉलीचा क्रमांक एम. एच. 11 बी. डी. 2849) घेऊन ट्रॅक्‍टर (क्र. एम. एच. 11 सी. डब्ल्यू. 5210) निघाला होता.

त्याचवेळी दुचाकीवरून (क्र. एम. एच. 11 सी. पी. 7514) आलेले अभिजित यांनी जोरात ब्रेक मारल्यामुळे दुचाकी घसरली आणि तोल गेल्याने दुचाकीसह ते समोरून येणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या पाठीमागील ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडले. ट्रॉलीचे चाक डोक्‍यावरून गेल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत. 


पसरणी घाटात तीन पर्यटक जखमी
 

वाई : पसरणी घाटात दत्त मंदिराजवळ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेले पती-पत्नी व त्यांची लहान मुलगी जखमी झाली. पाथर्डी (अहमदनगर) येथील श्रीकांत नंदकुमार टेके हे आपल्या कुटुंबीयांसह महाबळेश्वरला कारमधून (क्र. एम. एच. 12 एस. इ. 6659) फिरायला आले होते. रविवारी घरी परत जाताना पसरणी घाटात दत्त मंदिराजवळ वळणावर त्यांच्या गाडीची आणि वाईहून पाचगणीला जाणाऱ्या दुसऱ्या कारची (क्र. एम. एच. 12 एफ. एफ. 2182) धडक झाली. 

त्यामध्ये श्री. टेके, त्यांची पत्नी व लहान मुलगी (दोघींची नावे समजली नाहीत) जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पाचगणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वाईचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेत वाहतूक सुरळीत केली.

सेनेच्या प्रयत्नानंतर चारा छावणी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल हाेणार?

Video पाहा : बळीराजाची मोदी एक्सप्रेस; चाळीसचा प्रवास पंचवीस रुपयांत

सात वर्षाच्या तुनजाने वडिलांना वाचवले; आजीसह भाऊ वाहून गेला

अचानक धाडी टाकून दुकानांची तपासणी करुन जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई हाेणार 

Edited By : Siddharth Latkar