esakal | पसरणी घाटात कार कोसळून एक ठार, तर दोघे जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

पसरणी घाटात कार कोसळून एक ठार, तर दोघे जखमी

वाईतील पसरणी घाटात अपघाताचे प्रमाण वाढत असून छोटे-मोठे अपघात ही नित्याचीच बाब बनली आहे. काही दिवसांपूर्वी असाच अपघात याठिकाणी घडला होता. घाटाचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज समोर येत आहे.

पसरणी घाटात कार कोसळून एक ठार, तर दोघे जखमी

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : येथील पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळ सकाळी ११ वाजता स्वीफ्ट कार खोल दरीत कोसळून एक महिलेचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, ही माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून शोध कार्य सुरु आहे.

वाईतील पसरणी घाटात अपघाताचे प्रमाण वाढत असून छोटे-मोठे अपघातही नित्याचीच बाब बनली आहे. काही दिवसांपूर्वी असाच अपघात याठिकाणी घडला होता. घाटाचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज समोर येत आहे.

कऱ्हाडात बिहार पॅटर्न यशस्वी; 157 गावांतील 69 हजार वृक्षांना जीवदान

बुवासाहेब मंदिराजवळ सकाळी ११ वाजता स्वीफ्ट कार भरवेगात येऊन खोल दरीत कोसळली आहे. त्या कारचा चेंदामेंदा झाला असून यात एक महिलेचा मृत्यू देखील झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. अद्याप, अपघातग्रस्तांची ओळख पटली नाही, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. सध्या घाटात शोध मोहीम सुरु असून लवकरच अपघातग्रस्तांची ओळख सांगितले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही मोहीम राबली जात असल्याचेही शेवटी स्पष्ट केले.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top