esakal | कास पठारवर फिरणे आले अंगलट; वन समितीने पर्यटकांकडून वसूल केला दंड सरसकट
sakal

बोलून बातमी शोधा

कास पठारवर फिरणे आले अंगलट; वन समितीने पर्यटकांकडून वसूल केला दंड सरसकट

कोरोनामुळे शासनाने पर्यटन बंदी कायम ठेवली असल्याने वन समितीने या वर्षीचा फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी बंद ठेवल्याचे जाहीर केले आहे. ठिकठिकाणी सूचना फलक लावूनही अनेक पर्यटक कास पठारवर दाखल होत आहेत. कुंपनाच्या आत फुलांमध्ये बेकायदेशीर प्रवेश करत असल्याने वन विभागाच्या सूचनेनुसार वन समितीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

कास पठारवर फिरणे आले अंगलट; वन समितीने पर्यटकांकडून वसूल केला दंड सरसकट

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (जि. सातारा) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कास पठारवर पर्यटकांना बंदी असतानाही काही पर्यटक कास पठारवर येत असून ते विनापरवानगी प्रवेश करत असल्याने त्यांच्यावर वन समितीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आज (ता. २०) दोघांवर कारवाई करत त्यांच्याकडून एक हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. 

जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठार हे नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांनी बहरले असून काही पर्यटकांना कोरोनाच्या महामारीतही पर्यटनस्थळे बंद असतानाही नैसर्गिक फुलांचा आनंद लुटण्याचा मोह आवरेनासा झाला आहे. अनेक पर्यटक कास पठारकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कास रोडवर वाहनांची वर्दळ वाढल्यांचे दिसून येत असून काही पर्यटक रोडवरूनच फुलांचा आनंद लुटत आहेत, तर काही पर्यटक कुंपन जाळीच्या खालून फुलांच्या राखीव क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश करत आहेत. 

अबब.. पाटणमध्ये आढळला साडेआठ फुटाचा भलामोठा अजगर

कोरोनामुळे शासनाने पर्यटन बंदी कायम ठेवली असल्याने वन समितीने या वर्षीचा फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी बंद ठेवल्याचे जाहीर केले आहे. ठिकठिकाणी सूचना फलक लावूनही अनेक पर्यटक कास पठारवर दाखल होत आहेत. कुंपनाच्या आत फुलांमध्ये बेकायदेशीर प्रवेश करत असल्याने वन विभागाच्या सूचनेनुसार वन समितीने कारवाईची मोहीम हाती घेतली असून आज रविवारी कुंपनाच्या आत फुलांमध्ये प्रवेश करणाऱ्या दोन पर्यटकांवर कारवाई करत प्रत्येकी 500 रूपये दंड वसूल केला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top