esakal | पोषण आहारात विद्यार्थ्यांना मध देणार; आदिती तटकरेंची ग्वाही

बोलून बातमी शोधा

पोषण आहारात विद्यार्थ्यांना मध देणार; आदिती तटकरेंची ग्वाही

मध संचालनालयाकडून तयार करण्यात येणाऱ्या मधाची मोठ्या प्रमाणात जाहिरात करावी, तसेच भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मधाची निर्मिती कशी होते, याची चित्रफित दाखवावी, असे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.

पोषण आहारात विद्यार्थ्यांना मध देणार; आदिती तटकरेंची ग्वाही
sakal_logo
By
अभिजीत खूरासणे

महाबळेश्‍वर (जि. सातारा) : शेतकरी शेतीपूरक व्यवसायाकडे वळला असून, मधुमक्षीपालन हे उत्पन्नाचे प्रभावी साधन आहे. याकडे शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने आर्थिक उन्नतीचा मार्ग म्हणून पाहावे, असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. येथील राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मध संचालनालय येथील प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन व विविध उपक्रमांचा प्रारंभ उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते नुकतेच झाले.

या वेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जे. मो. अभ्यंकर, खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रधान सचिव डॉ. नीलिमा केरकेट्टा, मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप उपस्थित होते.
 
मंत्री देसाई म्हणाले, ""मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाम आणि जेलीच्या ठिकाणी मधाची बाटली देत आहेत. मधालाही मागणी वाढली आहे. मध संचालनालयाने शेतकऱ्यांना मधुमक्षीपालनाबाबत प्रशिक्षित करावे. जेणे करून ते या व्यवसायाकडे वळतील. 100 कोटींच्या निधीतून महाबळेश्वरचा विकास होऊन पर्यटनाला अधिकची चालना मिळेल. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवा.'' 

आदिती तटकरे म्हणाल्या, ""स्थानिक उपलब्धतेतूनच उद्योग उभे करण्यावर शासनाचा भर आहे. मधाला अनन्यसाधारण महत्त्व असून, या मधाच्या सेवनामुळे आरोग्य चांगले राहते. या मधाचा लहान मुलांनी, गरोदर मातांनी रोज एक चमचा सेवन केले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व अंगणवाड्यांमध्ये शासनामार्फत पोषण आहार दिला जातो, या पोषण आहाराबरोबर विद्यार्थ्यांना एक चमचा मध सेवनासाठी मिळेल. यासाठी पाठपुरावा करणार आहे.'' 

मध संचालनालयाकडून तयार करण्यात येणाऱ्या मधाची मोठ्या प्रमाणात जाहिरात करावी, तसेच भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मधाची निर्मिती कशी होते, याची चित्रफित दाखवावी, असे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. मकरंद पाटील यांचेही भाषण झाले. प्रधान सचिव डॉ. नीलिमा केरकेट्टा यांनी प्रास्ताविक केले. दिग्विजय पाटील यांनी आभार मानले. या वेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील, बाळासाहेब भिलारे, डी. एम. बावळेकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. 

आपला पैसा आपल्या कामी: महावितरणची योजना; गावांसह शेतकऱ्यांनाही फायदा

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा झाला निर्णय

Video पाहा : उदयनराजेंचा जलमंदिर पॅलेस टू सुरुची बंगला प्रवास; सातारकरांच्या भुवया उंचावल्या 

सहकारी संस्थांनी विरोधकांच्या भूमिकेला बळी पडू नये

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलाल तर देशद्रोही ठराल

Edited By : Siddharth Latkar