उद्यापासूनची अकरावी प्रवेश प्रक्रिया रद्द... जाणून घ्या नवे वेळापत्रक

सिद्धार्थ लाटकर | Thursday, 13 August 2020

काेराेनाच्या पार्श्वभुमीवर कनिष्ठ महाविदयालयांना अकरावीची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेथे शक्य नसेल तेथे आॅफलाईन प्रक्रिया हाेईल. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी नमूद केले आहे.

सातारा : अकरावीची प्रवेश प्रक्रियेस उद्यापासून (शुक्रवार, ता. 14) प्रारंभ होणार होता. परंतु दहावीचे मूळ गुणपत्रक 17 ऑगस्टपर्यंत मिळणार असल्याने प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ही प्रक्रिया 18 ऑगस्टपासून सुरु होईल अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिली.नव्या वेळापत्रकानूसार जिल्ह्यात अकरावीची प्रक्रिया 18 ऑगस्टपासून सुरू होईल. प्रवेशासाठी 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज देणे व स्वीकारणे. 24 ते 26 ऑगस्टमध्ये प्रवेश अर्जाची छाननी, तपासणी व गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे.

'याच' वेळी साेडा काेयना धरणातील पाणी : गृहराज्यमंत्र्यांची सूचना

28 ऑगस्टला दुपारी तीन वाजेपर्यंत निवड यादी व प्रतीक्षा यादी सूचना फलकांवर लावली जाणार आहे. 29, 31, दोन व तीन सप्टेंबरला, निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. चार व पाच सप्टेंबर रोजी प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. 

हजाराे गणेशभक्तांचा नारा, चलाे सातारा.. चलाे सातारा 

सात व आठ सप्टेंबर रोजी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश शिल्लक असतील, तर मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. नऊ व दहा सप्टेंबरला रिक्त राहिलेल्या जागांवर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. याप्रमाणे अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असून, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

साताऱ्यातील सिव्हिलला मिळाला कारभारी, डॉ. गडीकरांचे काय झाले वाचा