मेढ्यात ऊर्जामंत्र्यांच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ वीज बिलांची होळी

विजय सपकाळ
Thursday, 26 November 2020

कोरोना काळातील वीजबिले कमी करा अथवा माफ करा, या मागणीसाठी "आम्ही जावळीकर' चळवळीच्या वतीने मेढा येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत वीज बिलांची होळी करण्यात आली.

मेढा (जि. सातारा) : कोरोना काळातील वीजबिले कमी करा अथवा माफ करा, या मागणीसाठी "आम्ही जावळीकर' चळवळीच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत वीज बिलांची होळी करण्यात आली. 

या प्रसंगी विलासबाबा जवळ म्हणाले, "सामान्य वीज ग्राहक संतापला असून आज बिले जाळली आहेत. पुढील काळात कनेक्‍शन तोडाल, तर संतापलेला सामान्य माणूस तोडणारालाही सोडणार नाही.'' कोरोना काळात मिटर रीडिंग न घेताच ग्राहकांना अंदाजे बिले देवून वाढीव बिले दिली होती. ही बिले न भरता ग्राहक शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते. पण, ऊर्जामंत्र्यांनी वीज ग्राहकांचा भ्रमनिरास केला आहे.

घटनेच्या यशाबाबत बाबासाहेबांनी इशारा दिला होताच; दुर्दैवाने माेदींकडून बळाचा वापर हाेताेय : पृथ्वीराज चव्हाण 

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यात आला. वीजबिले कमी करण्याचे निवेदन नायब तहसीलदार मिलिंद घाटगे यांना देण्यात आले. त्यानंतर वीज बिलांची होळी करण्यात आली. या वेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष बजरंग चौधरी, महेश पवार, संतोष कासुर्डे, अरुण जवळ, सुनील धनावडे, विजयमहाराज शेलार, राजेंद्र जाधव, सुभाष मिस्त्री, पांचाली पवार, कलाबाई पवार, शामल चव्हाण आदी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation Against Minister Nitin Raut At Medha Satara News