एफआरपीचा बैठकीत निर्णय न झाल्यास आंदोलन; 'बळीराजा'चा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एफआरपीचा बैठकीत निर्णय न झाल्यास आंदोलन; 'बळीराजा'चा इशारा

एफआरपीचा बैठकीत निर्णय न झाल्यास आंदोलन; 'बळीराजा'चा इशारा

कऱ्हाड : बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने एकरकमी एफआरपी अधिक सहाशे रुपये या मागणीसाठी तहसील कचेरीसमोर आज सातव्या दिवशीही बेमुदत धरणे आंदोलन सुरु राहिले. दरम्यान आज विविध संघटना, संस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. आम्ही साखर आयुक्तांच्या बैठकीची वाट पहात आहोत. त्यात निर्णय न झाल्यास आंदोलन सुरु करणार अशा इशारा बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.

हेही वाचा: ST STRIKE: विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही - अनिल परब

कऱ्हाड (जि.सातारा) येथील बळीराजा संघटनेच्या आंदोलनाच्या आजच्या सातव्या दिवशी बनवडी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास कारंडे, ग्रामपंचायत सदस्य. स्वाती पिसाळ, आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा विद्या मोरे, अध्यक्षा शांता कोठावळे, काकासाहेब जाधव, संदीप साळुंखे, सुमन कोळी, प्रिया आलेकरी, पुजा भातकर, सुनिता कोळी, नितीन कचरे, अविनाश पवार, सुनिता भोसले आदींनी पाठिंबा देत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पाटील, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला व पदाधिकाऱ्यांना सांगुन तशी पत्रे दिली.

हेही वाचा: मोठी बातमी! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

दरम्यान, प्रांतधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत साखर आयुक्तालयात एफआरपीप्रश्नी बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्या बैठकीत तोडगा निघेल अशी खात्री आहे. त्यात निर्णय न झाल्यास आंदोलन सुरु करणार अशा इशारा केंद्रीय अध्यक्ष पाटील यांनी दिला.

loading image
go to top