शेतकऱ्याने लाचेची रक्कम देताच ACB ने वीज अभियंत्यास पकडले

ठरल्याप्रमाणे संबंधित शेतकऱ्याने लाचेची ठरलेली रक्कम सोनवले यांच्याकडे दिली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून त्यास अटक केली. त्या रकमेची पडताळणी करून सोनवलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तालुका पोलिसात सुरू होती.
bribe
bribesystem

कऱ्हाड (जि. सातारा) : शेतीपंपासाठी नवीन वीज कनेक्‍शन देण्यासाठी शेतकऱ्याला पाच हजारांची लाच (bribe) मागणाऱ्या वीज कंपनीच्या (MSEB) कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (anti corruption bureau) सापळा रचून अटक केली. राहुल सोनवले (वय 38, रा.एमएसईबी रस्ता, ओगलेवाडी) असे अटक झालेल्याचे नाव आहे.(anti corruption bureau arrested mseb engineer accepting bribe farmer satara crime news)

लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाठार तेथील वीज कंपनीच्या कार्यालयातून शेतकऱ्यांना नवीन कनेक्‍शन देणे सुरू आहे. त्याअंतर्गत वाठारच्या वीज कंपनीच्या कार्यालयात तेथील शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी एका शेतकऱ्याला नवीन वीज कनेक्‍शन देण्यासाठी सोनवले यांनी पाच हजारांची मागणी केली. त्यानुसार ती रक्कम देतो, असे त्या शेतकऱ्याने सांगितले होते. त्यापूर्वी त्या शेतकऱ्याने तशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक अविनाश जगताप, हवालदार ताटे, येवले यांनी वाठार येथे बुधवारी जाऊन सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे संबंधित शेतकऱ्याने लाचेची ठरलेली रक्कम सोनवले यांच्याकडे दिली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून त्यास अटक केली. त्या रकमेची पडताळणी करून सोनवलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bribe
लईभारी! 16 दिवसांच्या आंदोलनाचं फलित; टॅंकरमुक्त 16 गावांचं स्वप्न पूर्णत्वास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com