esakal | कॉंग्रेसच्या ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी भानुदास माळी; नाना पटोलेंची मुंबईत घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

कॉंग्रेसच्या ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी भानुदास माळी; नाना पटोलेंची मुंबईत घोषणा

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी (Bhanudas Mali) यांनी राज्यातील 15 जिल्हाध्यक्षांसह विविध पदाधिकाऱ्यांसह मागील महिन्यात कॉंग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला. कॉंग्रेस पक्षाने त्यांचा राजकीय अनुभव लक्षात घेऊन त्यांची कॉंग्रेसच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. (Appointment Of Bhanudas Mali As OBC State President Of Congress Satara News)

महाराष्ट्रदिनी मुंबईतील टिळक भवनात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी श्री. माळी यांना ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र दिले. कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश प्रवक्‍ते सचिन सावंत, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, देवानंद पवार यांच्यासह कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते. या वेळी नाना पटोले म्हणाले, ""राज्यात ओबीसी व मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे; परंतु तो काही कारणास्तव विखुरला गेला आहे. त्यांना एकत्र करून कॉंग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली आणण्याची गरज आहे. त्यामुळे ही जबाबदारी राजकीय अनुभव, संघटन कौशल्य असणारे आणि ओबीसींच्या भावना लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या संमतीने माळी यांच्या खांद्यावर ओबीसी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकत आहे.

Maratha Reservation : मराठानगरात नेत्यांना प्रवेशबंदी; निवडणुकांवरही बहिष्कार!

माळी यांच्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसीसह इतरही समाज कॉंग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहात येईल. त्यामुळे कॉंग्रेस तळागाळापर्यंत मजबूत होईल.'' निवडीबद्दल श्री. माळी म्हणाले, ""देशातील सर्वात मोठ्या आणि स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या कॉंग्रेस पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडून राज्यातील ओबीसीसह इतर समाजातील लोकांनाही कॉंग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील राहीन.''

Appointment Of Bhanudas Mali As OBC State President Of Congress Satara News