कोरोनाशी दोन हात करून आशा स्वयंसेविका 'सुमन' पुन्हा जनसेवेसाठी सज्ज

कोरोनाशी दोन हात करून आशा स्वयंसेविका 'सुमन' पुन्हा जनसेवेसाठी सज्ज

गाेंदवले (जि. सातारा) : 21 ऑगस्ट 2020 हा दिवस माझ्यासाठी कायम लक्षात राहण्यासारखा ठरला, तो या दिवशी मी कोरोनाबाधित झाल्यामुळे. गोंदवले बुद्रुकमध्ये आशा स्वयंसेविका म्हणून काम करत असूनही मला कोरोनाची कोणतीच लक्षणे जाणवली नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुटीनच्या तपासणीत ऍन्टीजेन टेस्ट केली आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मला उच्च रक्तदाब आणि मधुमेह आहेच. पण, कोरोनाच्या तपासणीवेळी मधुमेह कमालीचा वाढला होता. ना ताप, ना खोकला, ना कसला त्रास जाणवत होता. पण, गावकऱ्यांना कोरोनापासून वाचविण्याच्या लढ्यात मीच बाधित होऊन घायाळ झाले होते. मनाने मात्र नेहमीप्रमाणेच खंबीर राहिले होते.
 
प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी झाल्यावर म्हसवडच्या शासकीय विलगीकरणात माझी रवानगी झाली. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्वच कोरोनाबधित रुग्णांप्रमाणेच घेतलेली काळजी माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी होती. अगदी वेळच्या वेळी तपासणी, औषधोपचार, जेवण, नाष्टा देऊन कुटुंबाप्रमाणेच ईश्वररूपी डॉक्‍टरांकडून माझी सेवा होत होती. परंतु, या काळात मला काळजी वाटत होती, ती माझ्या कुटुंबीयांची. घरात माझे पती हृदयरोग आणि रुग्ण मुलगा देखील मधुमेही. या दोघांसह माझी सून आणि नातवंडांचा तपासणी अहवाल देखील कोरोनाबाधित आला होता. संपूर्ण कुटुंबाचा कणा असल्याने मी प्रत्येकवेळी कुटुंबावर आलेलं कसलंही संकट मोठ्या हिमतीने परतवत होते. पण, आता या संकटात माझ्या कुटुंबासोबत मी नव्हते.

मनाशी खूणगाठ बांधली अन् कोरोनाला धैर्याने तोंड दिले : पोलिस पाटील प्रशांत कोळी

घराजवळच कंटेनमेंट झोन करण्यात आलेला. परंतु, शेजाऱ्यांनी माणुसकीतून केलेली मदत अमूल्य होती. पिण्याचे पाणी, अन्नधान्य, भाजीपाला ते घरी पोच करत होते. 
इकडे हळूहळू माझ्या आरोग्यात सुधारणा होतच होती. मधुमेहाचा धोका आता संपला होता. तरीदेखील वैद्यकीय अधिकारी योग्य ती काळजी घेतच होते. बघता बघता दहा दिवस उलटले आणि मला घरी सोडण्यात आले. घरी आल्यावरसुद्धा योग्य काळजी घेतली त्यामुळे कोरोना कधी छुमंतर झाला समजलेच नाही.

बाळासाहेब म्हणतात, वयाच्या सत्तरीतही मी कोरोनाला गाडून आलो!

कोरोनाशी दोन हात करून आता मी पुन्हा जनसेवेसाठी सज्ज झाली. या कामात मला प्रत्यक्षात आलेल्या अनुभवाचा खूप फायदा होतोय. आशा स्वयंसेविका म्हणून काम करताना भयभीत लोकांना मानसिक आधार देण्याचे काम आता मी करतेय. कोरोना होऊ नये म्हणून काळजी घ्याच. पण, तरीही झालाच तर घाबरून न जाता वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य काळजी घ्या. तुम्ही नक्कीच कोरोनाला हरवू शकता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' समजूनच वागलात तर आपल्या घरापासून देशापर्यंत कुठेच कोरोना उरणार नाही, याची मला खात्री आहे.

नंदुरबारचे विनय गौडा साताऱ्याचे नवे सीईओ

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com