दुकानावर कारवाई; बाप-लेकाकडून आशा सेविकेला लोखंडी गजाने मारहाण

Crime News
Crime Newsesakal

फलटण शहर (सातारा) : ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) दुकानावर केलेल्या कारवाईचा राग मनात धरुन सस्तेवाडी (ता. फलटण) येथील बाप-लेकांनी आशा सेविकेस (Asha Workers) मारहाण करुन जखमी केले आहे. या प्रकरणी संबधितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई संबंधित आशा सेविकेनेच करावयास लावल्याच्या संशयावरुन ही मारहाण करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. (Asha Workers Beaten For Taking Action Against Shop In Phaltan Satara Crime News)

Summary

सस्तेवाडीत जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्याने राजेंद्र शेळके यांच्या दुकानावर कारवाई करण्यात आली होती.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून (Phaltan Rural Police Station) मिळालेली माहिती अशी, की सस्तेवाडी (ता. फलटण) येथे जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्याने राजेंद्र शेळके यांच्या दुकानावर कारवाई करण्यात आली होती. सदर कारवाईचा राग मनात ठेवून राजेंद्र तुकाराम शेळके व त्यांचा मुलगा सूरज राजेंद्र शेळके याने गावातील आशा सेविका शीतल संतोष शिंदे (Asha Workers Sheetal Shinde) (वय ३२) यांना शिवीगाळ व दमदाटी करुन लोखंडी गज व हातोड्याने मारहाण केली.

Crime News
धक्कादायक! खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह जाळला; खंडाळ्यात खळबळ

त्यामध्ये त्या जखमी झाल्या. रविवार दि. १३ जून रोजी दुपारी सव्वा चारच्या सुमारास शिंदे यांच्या घरासमोरच त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शीतल शिंदे यांनी फिर्याद दाखल केली असून राजेंद्र तुकाराम शेळके व सूरज राजेंद्र शेळके या बाप-लेकांविरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक कर्णे करीत आहेत.

Asha Workers Beaten For Taking Action Against Shop In Phaltan Satara Crime News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com