Ashadi Wari : माउलींच्‍या सोहळ्यात ग्रामविकासाचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadi Ekadashi governments National Gramswaraj Abhiyan Chitrarath Kalapathak Dindi

Ashadi Wari : माउलींच्‍या सोहळ्यात ग्रामविकासाचा जागर

सातारा - राज्याच्या ग्रामीण विकासात ग्रामस्थांचे मोठे योगदान असते. ग्रामीण विकासाबाबत जनजागृती करण्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त शासनाच्या राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाच्यावतीने चित्ररथ आणि कलापथक दिंडी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. माउलींच्या पालखी मुक्कामाच्या पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद या ठिकाणी हा चित्ररथ आणि कलापथक वारकऱ्यांना ग्रामविकासाची माहिती सांगत आहे.

प्रत्येक गावात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत असते. अनेक लोकांना बऱ्याचदा ग्रामीण भागाच्या विकासासाठी काय योजना आहेत, गावात कोणत्या योजना राबवल्या जात आहेत, गावात कोणती विकासकामे सुरू आहेत, याची माहिती नसते. त्यामुळे अनेक नागरिक योजनांपासून वंचित आहेत, तसेच अनेक गावांमध्ये विकासाचा असमतोल आहे. त्यासाठी यावर्षी सुधारित राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाच्या माध्यमातून शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण करण्यासाठी नऊ शाश्वत संकल्पनांच्या अंमलबजावणीद्वारे ग्रामपंचायतींची क्षमता बांधणी आणि सशक्त ग्रामपंचायतींसाठी शाश्वत विकास संकल्पनांवर आधारित ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करण्यात येणार आहेत, तसेच पुढील काळात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ग्रामविकासाची माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी या चित्ररथ आणि कलापथकाच्या माध्यमातून प्रबोधन केले जात आहे.

या कलापथकामधील राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानातील अधिकारी, कर्मचारी आणि कलापथकमधील कलाकार, गरिबीमुक्त, बालस्नेही, स्वच्छ व हरित, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, महिला स्नेही, आरोग्यदायी, जलसमृद्ध, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त आणि सुशासन युक्त गाव करण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत वारकऱ्यांना शासनाच्या योजनांची जनजागृती करण्यात येत आहे.

सर्वांची योजना सर्वांचा विकास’ या अभियानातून १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. हे करीत असताना गावांनी ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकास संकल्पना राबविण्यासाठी संकल्पनांचे ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केले आहेत. त्याची आगामी काळात प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. यासाठी ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आमच्या विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

- आनंद भंडारी, संचालक, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान, महाराष्ट्र राज्य.

Web Title: Ashadi Ekadashi Governments National Gramswaraj Abhiyan Chitrarath Kalapathak Dindi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top