शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पवारवाडीच्या दोघांवर 'अॅट्रॉसिटी'!

ऋषिकेश पवार
Saturday, 31 October 2020

फिर्यादी पारधी समाजातील आशा कैलास पवार व मुलगा नीलेश कैलास पवार हे पवारवाडी येथील पडीक गायरान माळावर शेळ्या चारत होते. शेळ्यांची करडे जवळच्या सतीश पवार यांच्या शेतात गेली म्हणून प्रभाकर लावंड यांनी आशा पवार यांना आमच्या शेतात पुन्हा शेळ्या चारायच्या नाहीत, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.

विसापूर (जि. सातारा) : पवारवाडी (दरूज) येथील पडीक गायरान माळावर शेळ्या चारत असताना त्यांची करडे शेजारच्या शेतात गेली म्हणून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पवारवाडी येथील दोघांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकर लावंड व सतीश विलास लावंड (रा. पावरवाडी) अशी त्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पारधी समाजातील आशा कैलास पवार व मुलगा निलेश कैलास पवार हे पवारवाडी येथील पडीक गायरान माळावर शेळ्या चारत होते. शेळ्यांची करडे जवळच्या सतीश पवार यांच्या शेतात गेली म्हणून प्रभाकर लावंड यांनी आशा पवार यांना आमच्या शेतात पुन्हा शेळ्या चारायच्या नाहीत, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. 

ढेबेवाडी-पाटण प्रवास..घोडं खाईना भाडं; बस स्थानकात सन्नाटा

लाकडी काठीने मारहाण करत डोक्‍याचे केस ओढून जमिनीवर आपटले, तसेच प्रभाकर लावंड व सतीश लावंड यांनी मुलगा नीलेश यालाही लाथाबुक्‍क्‍या व हाताने मारहाण केली. अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार दोघांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक जी. आर. किंद्रे तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocity Case Filed Against Two In Pawarwadi Satara News