वाहतूक पोलिसानं 7500 रुपये दंड मागताच युवकानं अंगावर ओतून घेतलं डिझेल

Traffic Branch Police in Satara
Traffic Branch Police in Sataraesakal
Summary

पोलिसांकडून दुचाकी, चारचाकी वाहनधारकांवर नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई केली जात आहे.

सातारा : येथील मुख्य बसस्थानक (Satara Bus Stand) परिसरात वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या भरमसाठ दंडाच्या बिलाला कंटाळून रागाच्या भरात एका वाहनधारकानं स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रकार केल्याची घटना सोमवारी घडलीय. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडून गेली. मात्र, पोलीस व नागरिकांनी प्रसंगावधान साधत त्या युवकाला पकडल्यामुळं पुढील अनर्थ टळला आहे.

साताऱ्यात सध्या वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून (Traffic Branch Police in Satara) दुचाकी, तसेच चारचाकी वाहनधारकांवर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई केली जात आहे. कारवाई करत असताना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडून ठराविक रक्कम दंड स्वरूपात मागितली जात आहे. त्यानंतर दंडाची पावतीही वाहनधारकांना दिली जात आहे. दरम्यान, सोमवारी वाहतूक पोलीस सोमनाथ शिंदे (Somnath Shinde) हे सातारा बसस्थानक परिसरात वाहनचालकांवर कारवाई करत असताना त्यांनी ट्रिपलसीट चाललेल्या दुचाकी चालकाला अडवून 7500 रुपयांचा दंड मागितला.

Traffic Branch Police in Satara
सावंतवाडी संस्थानच्या युवराजांचा भाजपात जाहीर प्रवेश

यावेळी जवळ पैसे नसल्याचे कारण देत युवकानं आपण वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्याचं कबुल करत दंड भरण्यास नकार दिला. तसंच “मी कोरोनातून नुकताच बरा झालो असून 2 महिने झाले नोकरी नाही. अशात माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, असं दुचाकीचालकानं सांगितले. मात्र, तरीही वाहतूक पोलीस दंड वसूल करण्यावर ठाम राहिल्याने त्याची आणि वाहतूक पोलीस शिंदे यांची बाचाबाची झाली. यावेळी संबंधित युवकानं रागाच्या भरात अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला पोलिस आणि नागरिकांनी पकडलं. दरम्यान, या घटनेनंतर युवकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) पैश्याची मागणी केल्याचा आरोप युवकानं केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com