तानाशाही नही चलेगी, मोदी हटाव...मलिकांवरील कारवाईचा केला निषेध

कऱ्हाडमध्ये घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना निषेध व्यक्त केला
Balasaheb Patil Protest against Nawab Malik ed action
Balasaheb Patil Protest against Nawab Malik ed actionsakal

कऱ्हाड : नही चलेगी नही चलेगी... तानाशाही नही चलेगी..., मोदी हटाव... देश बचाव..., सरकार हमसे डरती है... ईडी को आगे करती है..., या ना अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेचा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आज येथे निषेध व्यक्त केला.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून त्यांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील, काँग्रेसचे अशोकराव पाटील, मजहर कागदी, शिवसेनेच्या ग्राहक मंचाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र माने, काकासाहेब जाधव, संतोष पाटील, पांडुरंग चव्हाण, नंदकुमार बटाणे, कांतिलाल पाटील, लालासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे सोहेल बारस्कर, माजी नगरसेवक पोपटराव साळुंखे, शिवाजीराव पवार, गंगाधर जाधव, अख्तर आंबेकरी, पराग रामुगडे, प्रशांत यादव, महंमद आवटे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.

या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माने म्हणाले, ‘‘देशात लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून केंद्र सरकारच्या ईडी, सीबीआय याच्या माध्यमातून लोकशाहीचा खून करण्याचे कम होत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर कोणत्याही शासनाने यापूर्वी केला नाही. मात्र, भाजपने ते सुरू केले आहे. मंत्री नवाब मलिक यांचा २० वर्षांपूर्वीचा व्यवहार आताच कसा बाहेर काढला? सरकार या देशात वाईट पद्धतीने काम करून खोट्या केसेमध्ये गोवण्याचे काम केले जात आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करत आहोत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com