'काँग्रेस'चा पराभव करणं राष्ट्रवादीला सोपं नव्हतं; पण 'या' सख्या भावांनी घेतली मेहनत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil

सहकारमंत्र्यांच्या विजयामागे त्यांच्या दोन सख्या बंधूंचे मोठे कष्ट आहेत.

'काँग्रेस'चा पराभव करणं राष्ट्रवादीला सोपं नव्हतं; पण..

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील (Satara Bank Election) प्रतिष्ठेच्या लढतीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) यांचा पराभव केला. सहकारमंत्र्यांच्या विजयामागे त्यांच्या दोन सख्या बंधूंचं मोठं कष्ट आहे. त्यांचे बंधू जयंत पाटील (Jayant Patil) व सुभाष पाटील यांनी पडद्यामागची सुत्रे हालवून सहकामत्र्यांचा विजय सुकर केला. त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यात सहकारमंत्र्यांचे चिरंजीव जशराज पाटील, पुतणे सागर पाटील, नगरसेवक सौरभ पाटील व सहकाऱ्यांनी केलेली मदतही विजयाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोलाची ठरली.

हेही वाचा: कोरेगावात राष्ट्रवादीला धक्का; नाराजी फॅक्टर भोवला?

सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणूक रिंगणात कऱ्हाड सोसायटी गटातून खुद्द सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे निवडणुकीसाठी उभे होते. त्यांच्या विरोधात अॅड. उंडाळकर यांनी निवडणूक लढवली. सहकारमंत्री या निवडणुकीत उभे असल्याने ही निवडणूक राज्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. वरवर सोपी वाटणारी निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात रंगात आली होती. एका-एका मतासाठी दोन्ही गटाकडून फिल्डींग लावली होती. दरम्यान, विजयासाठी आवश्यक असलेली फिगर जुळवण्यासाठी भोसले गटाशी संपर्क साधून त्यांना आपल्याबरोबर घेण्यासाठी सहकारमंत्र्यांचे बंधू जयंत पाटील यांनी मोठे कष्ट घेतले. ते गेल्या अनेक वर्षांपासून भोसले गटाशी मैत्रीपूर्ण संपर्कात आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल मध्यंतरी ते भाजपमध्ये जाणार की काय? अशी चर्चा सुरु होती.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

मात्र, भविष्यातील राजकणाचा वेध घेवून त्यांनी भोसले गटाशी केलेली सलगी सहकारमंत्र्यांना सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कामी आली. त्यांच्याबरोबरच त्यांचे बंधू सुभाष पाटील यांनीही पडद्यामागची सुत्रे हलवली. त्यांच्या माध्यमातून सर्व यंत्रणा राबवण्यात आली. त्या दोन बंधूंनी घेतलेल्या कष्टामुळं आणि मतदारांनी केलेल्या साथीमुळं सहकारमंत्र्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यात सहकारमंत्र्यांचे चिरंजीव जशराज पाटील, पुतणे सागर पाटील, नगरसेवक सौरभ पाटील व सहकाऱ्यांनी केलेली मदतही विजयाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोलाची ठरली.

हेही वाचा: भाजपच्या साथीनं NCP सहकारमंत्र्यांकडून 'काँग्रेस'चा करेक्ट कार्यक्रम

loading image
go to top