कऱ्हाडच्या दत्त चौकात भाजपाचे 'या' साठी धरणे आंदाेलन

कऱ्हाडच्या दत्त चौकात भाजपाचे 'या' साठी धरणे आंदाेलन

कऱ्हाड : कोरोनामुळे तीन महिन्यांपासून सर्वत्र महासंकट सुरू आहे. त्या कालावधीत वीज वितरण कंपनीने ग्राहकांना वाढीव वीजबिले पाठवली आहेत. महावितरण कंपनीकडून मनमानी होत आहे. सरासरी बिल पाठविण्यापेक्षा ती माफ करावीत, अशी अशी मागणी भाजपने नुकतीच येथे धरणे धरली. येथील वीज वितरण कंपनीबाहेरील दत्त चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन झाले. या वेळी मुख्य कार्यकारी अभियंता नवाळे यांना निवेदन देण्यात आले.
काॅंग्रेसच्या माेठ्या नेत्याला घेरण्याची भाजपची खेळी 
 
निवेदनात म्हटले आहे, की लॉकडाउनच्या काळात सगळेच बंद होते. त्यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती गंभीर आहे. त्यात वीजबिलाचा शॉक बसला आहे. लहान मोठ्या उद्योग, घरगुती नागरिकांना वाढीव वीजबिलाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. वीजबिल भरणा करण्यासाठी व वीजबिलाची रक्कम कमी करून घेण्यासाठी महावितरणमार्फत अर्ज भरण्यास सांगितले जात आहे. वीजबिल भरणा केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातून कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यात सामाजिक अंतर पाळले जात नाही. त्या सगळ्याचा विचार करून कोरोना काळातील वीजबिले माफ करावीत आणि आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचीही वाढीव वीजबिले पूर्णपणे माफ करण्यात यावीत.

उरमोडी धरणानजीकच्या 'त्या' प्रसिद्ध हाॅटेल चालकावर गुन्हा

मुख्याधिकारी मॅडम राजेंच्या इलाक्यात : ही आहेत आव्हाने

या वेळी शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सीमा घार्गे, स्वाती जाधव, उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, उल्हास बेंद्रे, सरचिटणीस प्रमोद शिंदे व राहुल भिसे, विस्तारक सुनील शिंदे, भरत देसाई, विवेक भोसले, अनुसूचीत जाती शहर अध्यक्ष सागर लादे, सुहास चक्के, विश्वनाथ फुटाणे, अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष नितीन शहा, कायदा आघाडी अध्यक्ष विशाल कुलकर्णी उपस्थित होते.

संपादन - सिद्धार्थ लाटकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com