कऱ्हाडला भीम आर्मीचे फटे कपडे आंदोलन; सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी

कऱ्हाडला भीम आर्मीचे फटे कपडे आंदोलन; सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी

कऱ्हाड (जि. सातारा) : केंद्र शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाच्या विरोधात भीम आर्मीच्या वतीने चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कार्यालयासमोर फटे कपडे आंदोलन करण्यात आले. खासगीकरणामुळे सामान्य माणसांची अवस्था फाटक्‍या कपड्यासारखी होणार आहे. 

आंदोलनास भीम आर्मीचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, तालुकाध्यक्ष भागवत कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मन्सूर मुल्ला, पाटणचे फिरोज मुल्ला, जयवंत सोनवले यांच्यासह कऱ्हाड-पाटण तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

नायकवडी म्हणाले,  "केंद्र शासनाने खासगीकरणाच्या धोरणाचा आग्रह धरला आहे. रेल्वेसह अन्य खात्यांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. त्यामुळे सामान्य माणसांची अवस्था फाटक्‍या कपड्यासारखी होणार आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही जिल्ह्याचे फटे कपडे आंदोलन कऱ्हाडमध्ये केले आहे. शासनाने त्याचा विचार करून खासगीकरणाचे धोरण बदलावे, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com