किरीट सोमय्या आज जरंडेश्वरवर धडकणार

Kirit Somaiya
Kirit Somaiyaesakal
Summary

ईडीने (ED) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ८६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सातारा : जरंडेश्वर कारखान्याच्या (Jarandeshwar Sugar Factory) खरेदी प्रकरणात झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) आज (बुधवारी) जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आज पहाटे 3.45 वाजता ते सातारा स्टेशनवर पोहोताच त्यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं.

जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी प्रकरणी ईडीने (ED) उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह ८६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारखान्याची चौकशी सुरू असून, या पार्श्वभूमीवर सोमय्या आज जरंडेश्वर कारखान्याला भेट देत आहेत. यानिमित्ताने त्यांचे कोरेगाव, खटाव व फलटण तालुक्यांत स्वागत होणार आहे. श्री. सोमय्या जरंडेश्वर कारखान्याला भेट देऊन तेथील पाहणी करणार आहेत. जरंडेश्वरचे पदाधिकारी व सभासदांसह शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सोमय्या यांनी मनी लॉर्डिंगप्रकरणी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर आरोप करत हा कारखाना चुकीच्या पद्धतीने विकला आहे. आता कारखाना सभासदांच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर ते आज (बुधवारी) जरंडेश्वर कारखान्यावर जाऊन पाहणी करणार आहेत, तसेच या कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी सभासदांशी संवाद साधणार आहेत.

Kirit Somaiya
संपूर्ण महाराष्ट्राला माहितीय मी कसा आहे : अजित पवार

असा आहे दौरा...

पहाटे सव्वातीन वाजता त्यांचे सातारा रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात येतील व तेथे मुक्काम करतील. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ते कोरेगावकडे जातील. तेथे आझाद चौक व जुना मोटर स्टॅण्ड येथे त्यांचे स्वागत होईल. साडेदहा वाजता ते जरंडेश्वर साखर कारखान्याची पाहणी करतील, तसेच चिमणगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते पुसेगावकडे जातील. तेथे त्यांचे स्वागत होईल. त्यानंतर डिस्कळ व फलटण येथेही त्यांचे स्वागत होईल. दुपारी पावणेएक वाजता ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजभवन या निवासस्थानी जातील. तेथून ते बारामतीला जातील.

Kirit Somaiya
राष्ट्रवादी पराभवाचा वचपा काढणार? दादांमुळे कार्यकर्ते 'चार्ज'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com