'माण'च्या नेत्यांबद्दल पक्षश्रेष्ठी ठरवतील : विक्रम पावसकर

'माण'च्या नेत्यांबद्दल पक्षश्रेष्ठी ठरवतील : विक्रम पावसकर

सातारा : माण खटाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर आणि अनिल देसाई यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विराेधात काम केल्याने ते सध्या बाजूला पडले आहेत. त्यांच्याबाबत प्रदेश स्तरावरुन निर्णय घेतला जाईल असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत रविवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पावसकर बाेलत हाेते. त्यावेळी व्यासपीठावर आमदार रणजितसिंह माेहिते पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले, दत्ताजी थाेरात आदी उपस्थित हाेते.

माण तालुक्यात पक्ष उभारी घेत नसल्याचे सध्या लक्षात येत असून डाॅ. दिलीप येळगावकर आणि अनिल देसाई यांच्याकडे जबाबदारी देऊन पक्ष बळकट करणार का या दाेन्ही मातब्बर नेत्यांना सध्या बाजूला करण्याचे नेमके कारण काय या प्रश्नावर पावसकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते डाॅ. येळगावकर आणि युवा नेते अनिल देसाई यांनी विधानसभा निवडणुकीत माण खटाव मतदारसंघात पक्ष विराेधी काम केले. या दाेन्ही नेत्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराचे काम केले नाही. आमच्या पक्षाच्या शिस्तीला हे धरुन चालले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई हाेईल. ही कारवाई प्रदेशस्तरावरुन हाेते. भाजपमध्ये नेता, कार्यकर्ता असा भेद केला जात नाही. काेणाला पाहून निर्णय घेतले जात नाहीत तर शिस्त पाळणा-यांना फळ मिळते असेही पावसकर यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीची राज्यात दडपशाही : रणजितसिंह मोहिते-पाटील

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्राचे हाेतेय नुकसान : पृथ्वीराज चव्हाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com