जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपची निदर्शने; मलिकांच्या राजीनाम्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP protests front of Collector office Demand Nawab Malik resignation satara

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपची निदर्शने; मलिकांच्या राजीनाम्याची मागणी

सातारा : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचा महाविकास आघाडी सरकारने तत्काळ राजीनामा घ्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, या मागणीसाठी जिल्हा भाजपच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दमदमून गेला. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. सुरुवातीला बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आयोजित केला होता. मात्र, मोर्चाला पोलिसांनी आक्षेप घेतल्यानंतर मोर्चा रद्द करून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. या वेळी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. भाजपच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती सरदेशमुख यांना निवेदन देण्यात आले.या वेळी बोलताना विक्रम पावसकर म्हणाले, ‘‘मलिक यांना प्रवर्तन संचालनालय यांनी अटक केली असून, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो, तर दुसऱ्याचा राजीनामा का घेतला जात नाही?

१९९३ च्या बॉम्बस्फोटात ज्यांचे बळी गेले त्यांच्याविषयी भाजपच्या भावना अतिशय संवेदनशील आहेत. मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची कृत्ये आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडू.’’ या वेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरभी चव्हाण-भोसले, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीलेश नलवडे, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, श्रीहरी गोळे, संतोष जाधव, एकनाथ बागडी, महेश जाधव, बजरंग गावडे, धनंजय माने, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, भरत मुळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जयकुमार शिंदे, सतीश भोसले, मनीषाताई पांडे, प्रियाताई नाईक उपस्थित होते.

Web Title: Bjp Protests Front Of Collector Office Demand Nawab Malik Resignation Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top