सातारा : दारूचा काळाबाजार रोखण्यासाठी नाकाबंदी

जिल्ह्याच्या सीमांवर उत्पादन शुल्कसह पोलिसही अलर्ट; अवैध दारू रोखण्याचेही आव्हान
 liquor black market
liquor black marketsakal

कऱ्हाड : सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी होणारा दारूचा काळाबाजार रोखण्यासाठी उत्पादन शुल्ककडून जिल्ह्याच्या सीमा भागात दोन दिवसांची नाकाबंदी होत आहे. पोलिसही ‘अलर्ट’ (police are also on alert)आहेत. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्याऱ्या पार्ट्यांतील अवैध दारूचा काळाबाजार रोखला जाणार का, हाच खरा प्रश्न आहे. सरत्या वर्षासाठीही दिव, दमणसह गोव्यावरून मोठ्या प्रमाणात दारूची आयात होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे ती रोखण्याचे आव्हान उत्पादन शुल्कसमोर आहे. त्यावर नियंत्रणसाठी उत्पादन शुल्क खात्याला पोलिसांशी समन्वय ठेऊन कारवाई करावी लागेल. मात्र, दोन्ही खात्यात समन्वय नसल्याने त्याचा फायदा दारू तस्कर उचलत आहेत.

 liquor black market
Omicron Updates : महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा स्फोट; भारतात 947 रूग्ण

अवैध दारूचा काळाबाजार सुसाट असून, पाटण भागात कोकणातून येणारी हातभट्टीची मोठी आवक होते. उत्पादन शुल्क खात्याने त्यावर कित्येकदा कारवाईही केली आहे. त्याच पद्धतीने उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने कारवाई करत बनावट दारू तयार करणारी हातभट्टी कऱ्हाड तालुक्यात वर्षभरापूर्वी उद्‌ध्वस्त केली होती. तयार होणाऱ्या दारूसाठी दिव, दमणहून कच्चा माल येत असल्याचे उत्पादन शुल्कच्या तपासात स्पष्ट झाले होते. मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नाही. गोव्याहूनही येणारी दारू तर सर्रास आहे. लॉकडाउनच्या काळात शेकडो लिटर दारू जप्तीच्या कारवाया नोंदवल्या आहेत. त्यामुळे दारूचा काळाबाजार चालतो. त्याला या कारवायाच स्पष्ट करतात. कोकणासहित दिव-दमणमधून यंदाही दारूचा मोठा साठा होणार असल्याची उत्पादन शुल्कला खबर लागली आहे. त्यामुळे उद्या (ता. ३०) ते शुक्रवारी (ता. ३१) भरारी पथकांकडून मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी होणार आहे. त्यात पोलिसांचे सहकार्य उत्पादन शुल्कने घेणे अपेक्षित आहे.(alcohol black market)

 liquor black market
सातारा : दंडवाढ जरुर करा; पण इतकी?

जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू व्यवसाय चालतो.त्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयश येत असल्याचा अनुभव आहे. दाखवण्यासाठी होणारी कारवाई गाजते. ठोस उपाय होताना दिसत नाहीत. पाच वर्षांत किमान पाच वेळा बनावट दारू तयार करणारे कारखाने उद्‌ध्वस्त केले गेले. मध्यंतरी हातभट्टी उद्‌ध्वस्त झाली.तासवडे, विरवडे, वाठार, चांदोलीचा रस्ता बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई झाली. मात्र, त्याचा पुढे तपास काहीच झाला नाही. तासवडेत तर किमान ३० लाखांचा मुद्देमाल जप्त झाला होता. मात्र, त्याचाही तपास पुढे सरकलाच नाही. अवैध किंवा बनावट दारूचा तपास न होण्यामागची कारणे अनेक आहेत. त्यामुळे आता वर्षाअखेरीच्या निरोपासाठी दीव, दमण, गोव्याहून दारू मोठ्या प्रमाणात आणली जात आहे. तपासाच्या नावाखाली तडजोडीही उघड असल्यानेच पुन्हा काळाबाजार जोमात येताना दिसतो आहे.

 liquor black market
कोल्हापूर : पावणे चारशे 'पोलिसांना' मिळणार बढती

‘ब्रेन’वरील कारवाईला समन्वयाची गरज

बनावट दारूचा कारखाना, हातभट्टी, विनापरवाना दारू वाहतूक अशा कारवायांमागील मुख्य ब्रेन कधीच गजाआड झाला नाही. त्यांचाही पर्दाफाश करण्यासाठी उत्पादन शुल्कचे कधी धाडस झाले नाही. कारवाईवेळी पोलिस व उत्पादान शुल्कमध्ये समन्वयाचा अभाव दिसतो. त्यांनी एकत्रित समन्वयाने काम केल्यास ते शक्य होईल. मात्र, दोन्ही विभागात कारवाईसाठी समन्वय नसल्याचे वारंवार दिसते. त्यावर ठोस निर्णय होताना दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com