रक्तदान हेच श्रेष्ठ दान! जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा, साताऱ्यात उद्या शिबिर

सध्या कोरोना संसर्गाच्या काळात जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई जाणवत आहे.
Blood Donation Camp
Blood Donation Campesakal

सातारा : कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लस घेतल्यानंतर महिनाभर रक्तदान करता येत नाही. त्यामुळे सध्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या आपत्ती काळातील ही गरज ओळखून "दै. सकाळ'ने पुढाकार घेत विविध संस्थांच्या मदतीने रक्तदान शिबिराचे (Blood Donation) आयोजन केले आहे. रविवार (ता. 16) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनंत इंग्लिश स्कूलमध्ये होणाऱ्या शिबिरात सामाजिक बांधिलकीतून तरुण वर्गाने लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Blood Donation Camp Tomorrow At Satara)

सध्याच्या कोरोनाच्या संसर्गाच्या काळात जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई जाणवत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर किमान महिनाभर रक्तदान करता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. या संकटाच्या काळात जिल्ह्यातील अनेक रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नसल्याने काही ठिकाणी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याने रक्तदात्यांनी पुढे येण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी सकाळ रिलीफ फंड, शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट, जिजाऊ प्रतिष्ठान, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट, बालाजी ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीशी लढताना जास्तीत जास्त रक्ताची उपलब्धता होण्यासाठी युवकांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Blood Donation Camp
चिंताजनक! साताऱ्यात गळतीमुळे 25 टक्के Oxygen वाया; प्लांटसाठी प्रयत्न आवश्‍यक

शिबिरातील सहभागी संस्था...

सातारा डिस्ट्रिक्‍ट जिम असोसिएशन, लायन्स क्‍लब सातारा कॅम्प, लायन्स क्‍लब एमआयडीसी, जिल्हा मंडप, लाईट, फ्लॉवर, डेकोरेशन असोसिएशन, नगरसेवक सुनील कोळेकर मित्रसमूह, कट्टा ग्रुप शाहूपुरी, जय श्रीराम प्रतिष्ठान, सजग पालक सामाजिक संस्था, शाहूपुरी प्राईड इन, सरकार ग्रुप, शाहूपुरी गणेशोत्सव मंडळ, मयूर बल्लाळ मित्रसमूह, सजग पालक फाउंडेशन, जिल्हा केटरिंग असोसिएशन, महात्मा गांधी क्रीडा मंडळ, धर्मवीर युवा मंच.

Blood Donation Camp
Maharashtra Lockdown : साताऱ्यात 'E-pass'साठी 36 हजार अर्ज दाखल; 24 हजार अर्ज मंजूर

नाव नोंदणीसाठी संपर्क :

  • विजय सुतार : 8380092211

  • अभिजित बर्गे : 9175116992

  • रवींद्र पवार : 9823888851

Blood Donation Camp Tomorrow At Satara

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com