'धक्कादायक'! साताऱ्यातील मुलींना शाळेत जायला अडचणी, उच्च न्यायालयाकडून सुमोटो दाखल

या मुली ४ किलोमीटर बोट चालवतात, जंगलातून जातात
beti padhao beti padhao
beti padhao beti padhaoSakal

सातारा जिल्ह्यातील एका खेड्यातील अल्पवयीन मुलींना शाळेत, बोटीतून आणि नंतर दाट जंगलातून शाळेत (School) जावे लागते. तेथील शाळेत जाण्याच्या परिस्थितीविषयी प्रकाशित झालेल्या धक्कादायक बातमीची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेत सुमोटो दाखल केला आहे. साताऱ्यातील (Satara) या मुलींच्या (Girls) धाडसाची चर्चाही होत आहे.

beti padhao beti padhao
सातारा मेडिकल कॉलेजात आजपासून प्रवेश

अहवालानुसार, संरक्षित क्षेत्र असलेल्या खिरवंडी गावातील मुलींना कोयना धरणाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत बोट चालविण्यास भाग पाडले जाते. तिथून घनदाट जंगलातून शाळेपर्यंत सुमारे 4 किलोमीटरचा प्रवास त्यांना करावा लागतो. त्यांची शाळा सकाळी ९ वाजता सुरू होते. जंगलात अस्वल, वाघ तसेच इतर वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. याबाबात मुंबईतक या ऑनलाइन पोर्टलवर बातमी प्रकाशित झाली होती. मात्र, राज्यातील काही शाळा कोरोनाचे रूग्ण वाढल्याने बंद असल्या तरी खिरवंडी गावातील विद्यार्थी रोजच अशा मार्गाने प्रवास करून शाळेत जात आहेत.

beti padhao beti padhao
कऱ्हाड : पंधरा फेब्रुवारीपर्यंत परीक्षा ऑनलाइनच; उदय सामंत

खंडपीठ काय म्हणाले?

या भागातील मुलांना विशेषत: मुलींना शिक्षणासाठी ज्या दिव्यातून प्रवास करावा लागत आहे, त्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या पाहून आम्ही निशब्द झालो आहेत. आमच्याकडे शब्द कमी आहेत, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आहे. सातारा जिल्ह्यातील खिरवंडी गावातील मुलांना आवश्‍यक ती सर्व मदत करण्‍यासाठी राज्‍य सरकार उपाययोजना करू शकते. मुलींनी शिकण्यासाठी अशाप्रकारे धाडस दाखविल्याबद्दल कोर्टाने त्यांचे कौतुक केले आहे. एकूण परिस्थिती लक्षात घेता, मुलींना संकटातून मार्ग काढावा लागतो आहे. मात्र त्या मुली- विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आस असून स्वत:ला घडविण्यासाठी धैर्य, इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

खंडपीठाचे निरीक्षण

राज्याकडून 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हे बोधवाक्य मुलींना सुरक्षित मार्ग आणि मैत्रीपूर्ण वातावरण उपलब्ध करून दिले तर साध्य होऊ शकते,' असे निरीक्षण न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि अनिल किलोर यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com