अनैतिक संबंधांतून प्रियकरानं काढला प्रेयसीचा काटा; दोन मुलांनाही विहिरीत ढकललं

Satara Crime News
Satara Crime Newsesakal
Summary

पंचनामा करताना योगिताच्या गळ्यावर ओरखडे पडल्याचे पोलिसांना दिसून आले, तसेच तिच्या नाकातून रक्तस्राव झालेला.

रहिमतपूर (सातारा) : वेलंग (शिरंबे) (ता. कोरेगाव) येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून प्रियकराने प्रियेसीचा गळा दाबून, तर तिच्या दोन मुलांचा विहिरीत ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल (Police Ajay Kumar Bansal) यांच्या निर्देशानुसार खुनी प्रियकराला २४ तासांच्या आत अटक करण्यात रहिमतपूर पोलिसांना यश आले आहे.

दत्ता नारायण नामदास (मूळ रा. राजे बोरगाव, ता. जि. उस्मानाबाद, सध्या रा. वेलंग- शिरंबे, ता. कोरेगाव) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. त्याने प्रियेसी योगिता (वय ३८) व तिची मुले तनुजा (वय १४) व समीर (वय १३) यांचा खून केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता हा मागील चार वर्षांपासून तो योगिता (वय ३८) सोबत वेलंग येथे राहात होता. गुरुवारी (ता. १६) योगिता तिच्या घरामध्ये मृत अवस्थेत आढळून आली. वेलंगचे पोलिस पाटील सचिन सुतार यांनी याबाबतची माहिती रहिमतपूर पोलिस ठाण्यात (Rahimatpur Police Station) दिली. त्यानंतर रहिमतपूर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी गेले. पोलिस पाटील सुतार, घरमालक राजेंद्र सपकाळ यांच्यासह पोलिसांनी घराची पाहणी केली. या वेळी योगिता मृत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पंचनामा करताना योगिताच्या गळ्यावर ओरखडे पडल्याचे पोलिसांना दिसून आले, तसेच तिच्या नाकातून रक्तस्राव झालेला व चेहरा निळसर पडल्याचेही समोर आले. त्यावरून योगिताचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला.

Satara Crime News
शहडोलमध्ये भीषण अपघात; पिकअप उलटून 5 ठार, 30 हून अधिक जखमी

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व उपअधीक्षक गणेश केंद्रे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. बन्सल यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश कड यांना तपासाच्या सूचना दिल्या. सतर्क झालेल्या पोलिसांनी योगिता व तिच्यासोबत राहणाऱ्यांची चौकशी ग्रामस्थांकडे केली. त्या वेळी तिच्यासोबत राहणारा दत्ता गावांमध्ये दिसत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचे मूळ गाव व नातेवाइकांबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांना राजे बोरगाव हे त्याचे गाव असल्याचे, तसेच त्याची बहीण ज्योती अहिवळे श्रीपूरबोरगाव (ता. अकलूज, जि. सोलापूर) येथे राहात असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी श्रीपूरबोरगावच्या स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी तेथील पोलिस पाटलाकडे दत्ताबाबत चौकशी केली. तेव्हा तो तिथेच असल्याचे उघड झाले. पोलिस पाटलांनी त्याला अकलूज पोलिस ठाण्यात हजर केले. त्यानंतर रहिमतपूर पोलिसांनी काल अकलूजला जाऊन दत्ताचा ताबा घेतला.

Satara Crime News
भारतासोबतच्या संबंधांवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं मोठं विधान; बायडेन म्हणाले..

योगिता हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातून बुधवारी (ता. १५) रात्री दहाच्या सुमारास आम्ही जेवण करून झोपलो. त्यानंतर मी उठून योगिताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तनू व समीरला झोपेतून उठवले. बाथरूमला जायच्या बहाण्याने त्यांना दुचाकीवरून तात्यांच्या मळ्यात नेले. तेथे असणाऱ्या विहिरीमध्ये ढकलून त्यांचाही खून केल्याची कबुली दत्ताने चौकशीमध्ये पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याने सांगितलेल्या विहिरीवर जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही चिमुकल्यांचा मृतदेह बाहेर काढला. या वेळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. चिमुकल्यांचे मृतदेह पाहिल्यावर प्रत्येक जण हळहळत होता. या प्रकाराबाबत रहिमतपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद सावंत यांच्या फिर्यादीनुसार दत्तावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश कड तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com