बैलगाडी शर्यत भरविणाऱ्यांवर गुन्हा; उंबर्डे, नसरापूर, कोरेगाव, ललगुण, भाडळेतील युवकांचा समावेश

आयाज मुल्ला
Monday, 14 September 2020

सध्या कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास धनाजी वायदंडे करीत आहेत.
 

वडूज (जि.सातारा) : उंबर्डे (ता. खटाव) गावच्या हद्दीत बेकायदेशीररित्या बैलगाडी शर्यत भरविणाऱ्या सात जणांवर वडूज पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत सहा लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंबर्डे येथील कॅनॉलजवळ मोकळ्या माळावर बेकायदा बिगर परवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोलिस कर्मचारी धनाजी वायदंडे, दीपक देवकर, संग्राम बाबर, संदीप शेडगे, श्री. सुतार, संतोष काळे, सागर बदडे, श्री. नरळे यांनी त्या ठिकाणी जाऊन या बैलगाडी अड्ड्यावर छापा टाकला.

मध्यरात्रीची घटना; जेवणाच्या बिलावरून दे दणादण
 
या कारवाईत दोन चारचाकी वाहने, सात बैलगाड्या असा एकूण सहा लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अशोक ऊर्फ पप्पू पवार, सूरज पवार, शंकर पवार, (तिघेजण रा. उंबर्डे), गणेश गिरंजे (रा. नसरापूर, पुणे), संतोष बुधावले (रा. आरफळ कॉलनी, कोरेगाव), अनिकेत घाडगे (रा. ललगुण), प्रकाश जाधव (रा.भाडळे) व अन्य चार ते पाच जणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करत बैलांना जोरात पळण्यासाठी चाबकाने मारून व शेपटी दाताने चावत व सध्या कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास धनाजी वायदंडे करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bullock Cart Race Case Registered Against Seven Citizens In Waduj Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: