सातारा परिसरात मटकाप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

प्रवीण जाधव
Saturday, 24 October 2020

शनिवार पेठेतील 501 पाटी, कोडोली व अजंठा चौक परिसरात मटका घेतल्याप्रकरणी आठ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

सातारा : शनिवार पेठेतील 501 पाटी, कोडोली व अजंठा चौक परिसरात मटका घेतल्याप्रकरणी आठ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण रवींद्र तपासे (रा. गुरुवार पेठ), अमित वायदंडे (रा. गुरुवार पेठ), श्रीकांत चव्हाण (रा. नकाशपुरा) व मालक समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा) अशी त्यांची नावे आहेत. 

त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे एक हजार 590 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कोडोली येथील विराज बेकरीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेडच्या आडोशाला मटका घेतल्याप्रकरणी समीर कच्छीसह अभिषेक प्रमोद जाधव (रा. मातंग वस्ती, कोडोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कऱ्हाड-चिपळूण मार्गावर राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर

या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे एक हजार 650 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तिसरी कारवाई अजंठा चौक परिसरात जुगार अड्ड्यावर करण्यात आली. या प्रकरणी ईश्‍वर चंद्रकांत घोरपडे (रा. कोरेगाव) व चंदू चोरगे (रा. रविवार पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे एक हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Case Has Been Registered Against Eight Persons In Satara Area