ग्रामसेवकास धक्काबुक्की; कौंदणीत पाच जणांवर गुन्हा

ग्रामसेवकास धक्काबुक्की; कौंदणीत पाच जणांवर गुन्हा

नागठाणे (जि. सातारा) : कौंदणी (ता. सातारा) येथील ग्रामसेवकास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी कौंदणी ग्रामपंचायतीत येथे ही घटना घडली.
 
प्रकाश ज्ञानू यादव, बजरंग प्रकाश यादव, विकास जयसिंग यादव, विलास जयसिंग यादव व जगन्नाथ नारायण यादव (सर्व. रा. कौंदणी, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कौंदणी गावचे ग्रामसेवक नीलेश विनायक गुरव (रा. मांडवे, ता. सातारा) यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.

भुईंज : अजून किती महिने रावसाहेब करणार अंधारात काम?

गुरव हे ग्रामपंचायतीत कामकाज करत असताना पाचही संशयित हे कार्यालयात आले. त्यांनी नळाची पाणीपट्टी, घरफळा भरणार नाही, असे म्हणून अर्वाच्य भाषा वापरली. गुरव यांना शिवीगाळ, दमदाटीही केली. या वेळी कॉलर धरून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. जन्म-मृत्यूचे रजिस्टरही संबंधितांनी उचलले. सरपंच लक्ष्मण यादव यांनी ते रजिस्टर पुन्हा ताब्यात घेतले. सोमवारी रात्री उशिरा नीलेश गुरव यांनी फिर्याद दाखल केली असून सहायक फौजदार वसंतराव जाधव पुढील तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com