esakal | पोवई नाक्‍यावरील 'त्या' प्रसिद्ध हॉटेलच्या मालकांसह चौघांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

पोवई नाक्‍यावरील 'त्या' प्रसिद्ध हॉटेलच्या मालकांसह चौघांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की गुलबहार हॉटेल शासनाने अधिकृत केलेले आहे. असे असतानाही सीसीटीव्ही फुटेजवरून तब्बल 30 लोकांनी जेवण केल्याचे दिसत आहे.

पोवई नाक्‍यावरील 'त्या' प्रसिद्ध हॉटेलच्या मालकांसह चौघांवर गुन्हा

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा ः येथील पोवई नाक्‍यावरील हॉटेल गुलबहार येथे 24 जुलै रोजी अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यानंतर त्या कारवाईच्या अहवालानुसार हॉटेल मालकांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल शासनाने अधिग्रहण केले असतानाही खासगी लोकांना जेवण देणे, खासगी लोकांना लॉजिंगने रूम भाड्याने देणे अशा प्रकारे हॉटेलकडून कोरोना या जीवितास धोकादायक असणाऱ्या रोगाचा संसर्ग पसरवण्यासारखी कृती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अभिनेते सयाजी शिंदेंची झाडांशी घट्ट मैत्री...!
 
हरदीपसिंग गुरमितसिंग रामगडिया (रा. रविवार पेठ), कमलेश मधुकर पिसाळ (रा. केसरकर पेठ), किशोर संजय मोहिते (वय 27, रा.कोडोली), धनंजय महादेव देसाई (वय 42, रा. गोडोली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील हरदीपसिंग रामगडिया व कमलेश पिसाळ हे दोघे हॉटेल मालक असून, याप्रकरणी हवालदार विशाल धुमाळ यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांनो खिसा रिकामा झालाय, मग 'ही' आहे तुमच्यासाठी गुड न्यूज
  
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ता. 24 जुलै रोजी अतिरिक्त पोलिस अधीक्षक शेख यांच्या पथकाने पोवई नाक्‍यावरील हॉटेल गुलबहार येथे छापा टाकला होता. रात्री छापा टाकल्यानंतर सुमारे पाच तास पोलिसांची कारवाई सुरू होती. याची माहिती समोर आल्यानंतर साताऱ्यात खळबळ उडाली. पोलिसांची कारवाई झाल्यानंतर मात्र त्या रात्री उशिरा व दुसऱ्या दिवशीही गुन्हा दाखल झाला नाही. याप्रकरणी शेख यांच्याशी संपर्क साधला असता सीसीटीव्ही फुटेजवर माहिती एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. हॉटेल गुलबहारप्रकरणी अहवाल पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवल्याचे शेख यांनी सांगितले होते.

झिंगलेल्या झिंगाटांना कुणीतरी आवरा रे...
 
शेख यांच्या अहवालावरून पोलिस अधीक्षक सातपुते यांनी त्यांना अहवालावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आज सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी स्वत: पोलिस तक्रारदार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की गुलबहार हॉटेल शासनाने अधिकृत केलेले आहे. असे असतानाही सीसीटीव्ही फुटेजवरून तब्बल 30 लोकांनी जेवण केल्याचे दिसत आहे. हॉटेलच्या संगणकावरून 19 बिले जप्त करण्यात आली असून, त्याद्वारे जेवण दिल्याचे दिसत आहे. खासगी लोकांना राहण्यासाठी लॉजिंग दिल्याचे निष्पन्न झाले आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक शासकीय अधिकारी मित्रांसमवेत त्या हॉटेलमध्ये दारू पित जेवण करत असल्याचे दिसत आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक शेख यांच्या अहवालातही संबंधित अधिकाऱ्याचे नाव आहे. 

Edited By : Siddharth Latkar

loading image