esakal | पुण्यातील एकासह साताऱ्यातील वकीलावर गुन्हा; निघाले हाेते महाबळेश्वरच विकायला
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील एकासह साताऱ्यातील वकीलावर गुन्हा; निघाले हाेते महाबळेश्वरच विकायला

अधिक तपास पोलिस निरीक्षक बी. ए कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

पुण्यातील एकासह साताऱ्यातील वकीलावर गुन्हा; निघाले हाेते महाबळेश्वरच विकायला

sakal_logo
By
अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : जमीन नावावर करून देतो, असे आमिष दाखवून सातारा येथील वकील व त्याच्या मित्राने 25 लाख रुपयांना लुबाडले असल्याची तक्रार वैभव लक्ष्मण गिरी (रा. वारजे-पुणे) यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी ऍड. रविराज गजानन जोशी (रा. सातारा) व सुहास लक्ष्मण वाकडे (रा. डेक्कन जिमखाना, पुणे) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 
साताऱ्यातील वैभव गिरी पुणे येथे राहात आहेत. परंतु, सातारा येथे त्यांचे सतत येणे-जाणे असते. 2018 मध्ये ऍड. रविराज जोशी यांच्याबरोबर ओळख झाली. त्यानंतर गिरी यांचे न्यायालयाचे काम पाहतात. यासाठी ते महाबळेश्वर येथेही जात असतात. एकदा त्यांची महाबळेश्वर येथे भेट झाली. त्यावेळी महाबळेश्वर लिंगमळा, प्रतापगड, वेण्णालेक, ऑर्थरसीट पॉइंट आदी परिसरात (कै.) दत्तो भैरव पिंगळे यांना देवस्थान जमीन ईनाम वर्ग तीनच्या सनदेने जमीन मिळाली आहे. त्यांचे वारस सध्या महाबळेश्वरमध्ये राहत असून, ते माझे ऐकण्यातील आहेत. मी व माझे पुण्यातील मित्र सुहास वाकडे हे पिंगळे यांची जमीन तुमच्या नावे करून देऊ शकतो, असे आमिष ऍड. जोशी यांनी गिरी यांना दाखविले. त्यानंतर ऍड. जोशी यांनी पुण्यातील सुहास वाकडे यांच्या पुण्यातील घरी एक बैठक घेतली. या बैठकीत देण्याघेण्याचे व्यवहार ठरले.

हॉटेल व्यवस्थापकास लाखाची खंडणी मागणाऱ्या साताऱ्यातील 15 जणांवर गुन्हा 

एकूण जमिनीपैकी 40 टक्के जमीन वैभव गिरी व माधवी ओतारी यांच्या नावे करण्यात येईल. उरलेली साठ टक्के जमीन ऍड. जोशी, सुहास वाकडे व पिंगळे यांच्या वारसांना देण्याचे निश्‍चित करण्यात आले. (हे पुर्ण क्षेत्र महाबळेश्वरचे आहे). वैभव गिरी व माधवी ओतारी यांनी जमीन खरेदी व्यवहारापोटी नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर या दोन महिन्यात पाच लाख रुपये दिले. झालेल्या व्यवहाराची नोटरी जानेवारी 2020 मध्ये पुण्यात करण्यात आली. त्यावेळी चार लाख रुपये रोख व सहा लाख रुपये बॅंकेतून वर्ग करून देण्यात आले. अशा प्रकारे दोन वर्षांत वैभव गिरी व माधवी ओतारी यांनी ऍड. जोशी व वाकडे यांना 25 लाख रुपये दिले. 25 लाखांच्या बदल्यात जी मिळकत दाखविली होती, तिचा ताबा देण्याची मागणी गिरी व ओतारी यांनी ऍड. जोशी व वाकडे यांच्याकडे केली. परंतु, या दोघांनी याबाबत टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे दिली. 

पोलिसांची कृष्णकृत्ये लपविण्यासाठी वर्षा देशपांडेंवर खोटा गुन्हा : ऍड. शैला जाधव 

गिरी हे पिंगळे यांचे महाबळेश्वर येथील वारसांची भेट घेण्यासाठी महाबळेश्वरला आले. परंतु, पिंगळे यांचे कोणी वारस महाबळेश्वर येथे राहात नाहीत, ही बाब स्पष्ट झाल्याने ऍड. जोशी व वाकडे यांनी संगनमत करून आपली व ओतारी यांची फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यांनी पुन्हा जमीन अथवा रक्कम परत मिळावी, असा लकडा लावला. परंतु, त्या दोघांनी काहीच दाद दिली नाही. अखेर गिरी यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. पोलिसांनी ऍड. जोशी व वाकडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक बी. ए कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

कोरोनासंशयित ठोकताहेत धूम!, पोलिसांसह आरोग्य खात्याची पळापळ 

Edited By : Siddharth Latkar

loading image