Phaltan Police : काळ्या प्लास्टिक पिशवीत आढळले गायीच्या मांसाचे तुकडे; शाहरुखवर पोलिसांची कारवाई

पोलिसांनी याप्रकरणी गोमांस (Beef) व कार असा एकूण पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Phaltan Case of Beef
Phaltan Case of Beefesakal
Summary

याप्रकरणी शाहरुख कुरेशी याच्यावर प्राण्याचा छळ प्रतिबंध, प्राणी संरक्षण अधिनियम व अन्य कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे.

फलटण शहर : शहरातील कुरेशीनगर पोलिसांनी (Qureshi Nagar Police) केलेल्या कारवाईमध्ये एका कारमध्ये अडीचशे किलोचे गोमांस मिळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कार व गोमांस असा एकूण पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, एकावर गुन्हा नोंद केला आहे.

Phaltan Case of Beef
Maharashtra Politics : आमच्या घराण्यात विश्‍वासघात करण्याची परंपरा नाही; उदयनराजेंचा शरद पवारांवर थेट वार

शाहरुख जलील कुरेशी (रा. मंगळवार पेठ, फलटण) असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की पोलिसांना काल पहाटे सव्वापाचच्या सुमारास माशाअल्लाह हॉटेलच्या समोर कुरेशीनगर, फलटण येथे कारमधील (क्र. एमएच १४ एव्ही ४०१७) पाठीमागील सीटवर २५ हजार रुपये किमतीचे अंदाजे अडीचशे किलो वजनाचे गोवंशीय मांसाचे तुकडे काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कागदात भरलेले मिळून आले.

Phaltan Case of Beef
Crime News : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ तर मुलीचा विनयभंग करुन धमकी; 10 जणांवर गुन्‍हा दाखल

पोलिसांनी याप्रकरणी गोमांस (Beef) व कार असा एकूण पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शाहरुख कुरेशी याच्यावर प्राण्याचा छळ प्रतिबंध, प्राणी संरक्षण अधिनियम व अन्य कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल अनिल देशमुख यांनी दिली असून, तपास पोलिस उपनिरीक्षक सूरज कदम करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com