राजमातांचे वकीलपत्र मागे घे, अन्यथा संपवू : दाेघांची धमकी

सकाळ वृत्तसेवा | Thursday, 9 July 2020

श्री. बडवे यांनी फिर्याद दिली असून हवालदार पाटील तपास करत आहेत.

सातारा : खटल्यात दाखल केलेले वकीलपत्र काढून घेण्यासाठी येथील एका वकिलाला काठीने मारहाण केल्याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशोक यशवंतराव बडवे (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) असे मारहाण झालेल्या वकिलाचे नाव आहे.
पुण्यातील सातारकरांसाठी उदयनराजेंचा पुढाकार

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अशोक बडवे यांनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्यामार्फत एका खटल्यात वकीलपत्र घेतले होते. त्यांच्यामार्फत घेतलेले वकीलपत्र रद्द करा व न्यायालयीन कामकाजातून बाहेर व्हा, अन्यथा तुम्हाला कायमचे संपवू, असे म्हणत त्यांनी काठीने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे बडवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार पाटील तपास करत आहेत. 

सातारकरांनो सावध व्हा; कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचे सावट

आता क्वारंटाइनसाठी कऱ्हाड पालिकेकडे जागाच नाही; शाळा, हाॅस्टेलच्या शाेधात 

प्रांताधिकारी म्हणाले, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार निर्णय घेऊ